
वाढत्या थंडीत शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक अळीव खीर
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांपासून गरमागरम खीर बनवली जाते. तांदूळ, गहू, मूग इत्यादी पदार्थांपासून बनवलेली खीर चवीला अतिशय सुंदर लागते. चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा पौष्टिक ठरते. पण कायमच त्याच ठराविक पदार्थांपासून बनवलेली खीर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये अळीवाची खीर बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये अळीव शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोएस्ट्रोजेन इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अळीव खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात आणि सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया अळीव खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)