कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग 'ही' सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा
सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत संपूर्ण दिवस नेमके कोणते पदार्थ बनवावे? बऱ्याचदा महिलांना सुचत नाही. कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा येतो. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ नाश्त्यात बनवले जातात. नाश्त्यात किंवा जेवणात विविध भाज्यांचे पराठे कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला कांद्याचा कुरकुरीत पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. कांद्याचा पराठा हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत अतिशय सुंदर लागतो. पण कांद्याचा पराठा बनवताना त्याच्या आतील सारण बाहेर येते आणि पराठा फुटून जाण्याची जास्त शक्यता असते. पराठा फुटल्यानंतर त्याच्या आतील सारण बाहेर येते आणि पराठा चपातीसारखा लागतो. या पद्धतीने पराठा बनवल्यास त्यातील सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि पराठ्याची चव अतिशय सुंदर लागेल. कांद्यात मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटते. त्यामुळे पराठा लाटताना पोलपाट अजिबात ओले ठेवू नये. चला तर जाणून घेऊया कांद्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? मग मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी






