१० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी
भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच उपलब्ध असतात. त्यात सगळ्यांचं आवडणारा पदार्थ म्हणजे चटणी. हिरवी मिरचीची चटणी, शेंगदाणा चटणी, वेगवेगळ्या भाज्यांच्या सालीची चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारातील चटणी घरात कायमच बनवल्या जातात. जेवणाच्या ताटात जर चटणी असेल तर चार घास जास्त जातात. गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा चटणी खाल्ली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते. शेंगदाणे आणि सुकं खोबर प्रत्येक घरात उपलब्ध असत. कारण शेंगदाण्याचा वापर भाजीमध्ये टाकण्यासाठी केला जातो तर सुक्या खोबऱ्याचा वापर करून वाटप तयार केले जाते. पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच चटणी किंवा लोणचं यांसारखे पदार्थ हवे असतात. चला तर जाणून घेऊया शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ






