
हिवाळ्यात शरीरातील ऊबदारपणा कायम टिकवून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीने घरी बनवा भोपळ्याचे सूप
राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता कायम टिकवून ठेवणे आवश्यक आहे. कारण वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. थंडीत काहींना वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा थकवा- अशक्तपणा वाढून आरोग्य बिघडून जाते. अशावेळी सकाळच्या नाश्त्यात कोणत्याही तेलकट पदार्थ खाण्याऐवजी शरीरात उष्णता कायम टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भोपळ्याचे सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. लहान मुलांसह मोठ्यांना भोपळा खायला अजिबात आवडत नाही. भोपळ्याची चव अतिशय पांचट लागते. पण भोपळ्यापासून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. भोपळ्याचे सेवन केल्यास शरीरात हायड्रेशन टिकून राहते. पाण्याची कमतरता जाणवत नाही. चला तर जाणून घेऊया भोपळ्याचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)