मार्गशीर्षमधील गुरुवारच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा रताळ्याचे वेफर्स
मार्गशीर्ष महिना सुरु झाला आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय या महिन्यात अनेक महिला उपवास सुद्धा करतात. उपवासाच्या दिवशी काय खावं? हा प्रश्न सर्वच महिला कायमच पडतो. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांसोबतच कंदमुळे, फळे, गाजर, पालक इत्यादी भाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. त्यातील सगळ्यांचं आवडणारी म्हणजे भाजी म्हणजे रताळ. गोड चवीचे रताळ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. रताळ्यांपासून भाजी. खीर, वेफर्स इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे वेफर्स बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे वेफर्स बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
साध्या चवीत दडलाय आनंद; बिर्याणीच दुसरं व्हर्जन ‘कुस्का राईस’ कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी






