Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा, दिवसाची सुरुवात होईल मस्त

नाश्त्यात नेहमीच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काकडी ओल्या खोबऱ्याचा चविष्ट डोसा बनवू शकता. हा डोसा हिरव्या चटणीसोबत सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 04, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा

सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे पोटही भरलेले राहते आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जातो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही काकडी आणि ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट डोसा बनवू शकता. वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून तुम्ही नाश्त्यातील पदार्थ बनवू शकता. डोसा तांदळाचे पीठ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवला जातो. वाढलेले वजन कमी करताना तुम्ही आहारात काकडीपासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करू शकता. कारण काकडी शरीर हायड्रेट राहते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी काकडीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया काकडी ओल्या खोबऱ्याचे डोसे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जेवणाची मजा होईल द्विगुणित; एकदा घरी बनवून तर पहा लज्जतदार भरलेली शिमला मिरची

साहित्य:

  • तांदूळ
  • काकडी
  • उडीद डाळ
  • मेथी दाणे
  • खोबऱ्याचा किस
  • भात
  • पोहे
  • हिरवी मिरची
  • मीठ
आषाढी एकादशी स्पेशल! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • काकडी ओल्या खोबऱ्याचे डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ करून पाण्यात भिजत ठेवा.
  • त्याच पाण्यात मेथी दाणे टाकून भिजत ठेवा. यामुळे डोसे चवीला सुंदर लागतील.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ आणि डाळ बारीक वाटून घ्या. डाळीसोबतच २ मिरच्या वाटून घ्या.
  • स्वच्छ धुवून घेतलेल्या काकडीचे बारीक बारीक तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे टाकून वाटून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक करून घेतलेली काकडी, खोबऱ्याचे किस आणि तांदळाचे मिश्रण टाकून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात आणि भिजवलेले पोहे घालून त्यात थोडस पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट डोश्याच्या मिश्रणात टाकून मिक्स करा.
  • पॅन गरम करून त्यावर तेल टाकून पसरवून घ्या. वरून तयार केलेले डोश्याचे मिश्रण गोलाकार पसरवा आणि दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला काकडी ओल्या खोबऱ्याचा चविष्ट डोसा.

Web Title: Make quick soft dosa with cucumber and wet coconut for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज
1

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाचा गोडवा वाढवा, घरी बनवा ‘तिरंगा बर्फी’, निवडक साहित्यांची लागेल गरज

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी
2

श्रावण महिन्यातील सणांसाठी परफेक्ट गोड पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ओल्या खोबऱ्याची दाटसर खीर, नोट करा रेसिपी

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
3

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
4

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.