
हिवाळ्यात बनवा मऊ लुसलुशीत बाजरीच्या पिठाची इडली, फायबरयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे पचनक्रिया राहील निरोगी
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर खूप जास्त भूक लागते. नाश्त्यात वेगवेगळ्या पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. या दिवसांमध्ये शरीरात उष्णता टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे संपूर्ण आरोग्य बिघडते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर अशक्तपणा, चक्कर येणे किंवा थकवा आल्यासारखे वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात बाजरीच्या पिठाचा वापर करून इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दक्षिण भारतीय पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मऊ इडली. वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात इतर कोणत्याही तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी इडली चटणी खावी. यामुळे तुमचे पोट सुद्धा जास्त वेळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. बाजरीमध्ये फायबर, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. चला तर जाणून घेऊया बाजरीच्या पिठाची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)