कांदाभजीपेक्षा लागेल सुंदर चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कांद्याच्या पातीची भजी
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. रक्ताची कमतरता दूर होते, आरोग्य सुधारते आणि शरीरात वाढलेला अशक्तपणा, थकवा कमी होतो. पण बऱ्याचदा लहान मुलांसह मोठेसुद्धा पालेभाज्या खाण्यास नकार देतात. पालेभाज्यांचे सेवन आवडीने केले जात नाही.कांद्याच्या पातीची भाजी चवीला सुंदर लागते. कमीत कमी साहित्यात बनवलेली भाजी तुम्ही गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. पण आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी नाहीतर कांद्याच्या पातीची भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कांद्याच्या पातीची भजी थंडीच्या दिवसांमध्ये बनवल्यास घरातील सगळेच खूप आवडीने खातील. जेवणात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो, अशावेळी कांद्याच्या पातीची भजी उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया कांद्याच्या पातीची भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






