
१५ मिनिटांमध्ये ताज्या आवळ्यांपासून बनवा आंबट तिखट लोणचं
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप जास्त आवडत. लोणचं पहिल्यांनंतर सगळ्यांचं तोंडाला पाणी सुटते. जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात लोणचं कायमच वाढले जाते. कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, मिरची लोणचं इत्यादी अनेक वेगवेगळ्या भाज्यांपासून लोणचं बनवली जातात. आज आम्ही तुम्हाला हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून आंबट तिखट लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा नव्याने वाढवण्यासाठी लोणच्याचे सेवन केले जाते. विटामिन सी आणि इतर अँटी अक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या आवळ्याचे सेवन केले शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. चला तर जाणून घ्या आंबट तिखट आवळ्याचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)