चंपाषष्ठीनिमित्त अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत वांग्याचं भरीत
प्रत्येक घराघरात चंपाषष्ठी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी खंडोबासाठी नैवेद्य बनवला जातो. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने सण उत्सव साजरा केले जातात. नैवेद्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वांग्याचं भरीत, भाकरी, कांद्याची पात असलेली भाजी इत्यादी अनेक पदार्थ या दिवशी घरात बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वांग्याचं भरीत खायला अनेकांना आवडत नाही. पण नैवेद्यासाठी बनवले पदार्थ सगळेच आवडीने खातात. अनेक भागांमध्ये गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गोड पदार्थांमध्ये प्रामुख्याने पुरणपोळी किंवा खीर बनवली जाते. चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव अतिशय सुंदर लागते. कमीत कमी वेळात वांग्याचे भरीत तयार होते. चला तर जाणून घेऊया अस्सल गावरान पद्धतीमध्ये वांग्याचं भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






