डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा
कामाच्या धावपळीमध्ये सकाळच्या वेळी नाश्ता बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले किंवा ब्रेड बटर, बिस्कीट इत्यादी पदार्थ विकत आणून खाल्ले जातात. पण कायमच नाश्त्यात विकतच्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. घरात कायमच रवा, उपमा, पोहे, इडली, डोसा इत्यादी पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भिजवलेल्या हिरव्या मुगाचे डोसे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिरवे मूग खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही काहींना काही पदार्थ बनवून मुलांना खाण्यास देऊ शकता. साऊथ इंडियन पदार्थ बनवण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ भिजवून पीठ तयार करावे लागते. मात्र कामाच्या धावपळीमध्येपीठ आंबवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भिजवलेल्या मुगाचे डोसे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया झटपट तयार होणारी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






