१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं
जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि झणझणीत पदार्थ हवा असतो. तोंडी लावण्यासाठी कायमच ताटात लोणचं घेतले जाते. लोणच्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. आंबटगोड चवीचे लोणचं ताटात असेल तर चार घास जास्त जातात आणि जेवण जेवल्यासारखे वाटते. कायमच कच्च्या कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, आवळ्याचे लोणचं किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले लोणचं आवडीने खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला हिरव्या मिरच्यांपासून लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय मिरचीचं लोणचं तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत अतिशय सुंदर लागतो. बाजारात विकत मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये व्हिनेगरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण जास्त प्रमाणात व्हिनेगरचे सेवन करणे शरीरसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ताज्या हिरव्या गार मिरच्यांपासून तुम्ही झटपट लोणचं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लोणचं बनवण्याची सोपी रेसिपि.(फोटो सौजन्य – istock)
Jaggery: साखरेऐवजी मध-गूळ आहे उत्तम पर्याय? खरंच Diabetes रूग्ण खाऊ शकतात का, तज्ज्ञांचा सल्ला






