सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पालक चिला
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, विटामिन, फायबर, झिंक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित एक तरी पालेभाजीचे सेवन करावे. पण लहान मुलांसह मोठ्यांना काहीवेळा पालेभाज्या खायला आवडत नाहीत. पालकच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर मुलं नाक मुरडतात. पालकची भाजी काहींना खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही लहान मुलांसह मोठ्यांसाठी सोप्या पद्धतीमध्ये पालक चिला बनवू शकता. पालक चिला लहान मुलं आवडीने खातील, याशिवाय तुम्ही मुलांना हा पदार्थ डब्यात सुद्धा देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा सोया चंक्स पराठा, वाचा सोपी रेसिपी
महागडे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा घरी १५ रुपयांमध्ये बनवा ‘मिंट मोइतो क्युब्स’, महिनाभर राहतील टिकून