१५ रुपयांमध्ये बनवा 'मिंट मोइतो क्युब्स', महिनाभर राहतील टिकून
उन्हाळ्यास सर्वच ऋतूंमध्ये लहान मुलांसह मोठ्यांना कोल्ड्रिंक्स, थंड पाणी पिण्याची सवय असते. तर काहींची थंड पाणी प्यायल्याशिवाय तहानच जात नाही. मे जून या गर्मीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर थंड पाणी प्यायले जाते. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. मात्र नेहमी नेहमी बाजारात विकत मिळणारे कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. बाजारात विकत मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्समध्ये अतिरिक्त साखरेचा वापर केला जातो, ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारात विकत मिळणारे कोल्ड्रिंक्स आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेल्या थंडगार कोल्ड्रिंक्सचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
थंडीच्या दिवसांमध्ये दुपारच्या जेवणात बनवा चटपटीत गरमागरम टोमॅटोचे सार, नोट करा सोपी रेसिपी
हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी महागडे सॉफ्ट ड्रिंक्स मागवले जाते. त्यामध्ये मोइतो, ज्युस किंवा अनेक वेगवेगळे कोल्ड्रिंक्स मागवले जातात. मात्र नेहमी नेहमी विकतचे मोइतो पिण्यापेक्षा घरी बनवलेले मिंट मोइतो तुम्ही पिऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये 15 रुपयांमध्ये मिंट मोइतो क्युब्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. मिंट मोइतो क्युब्स तयार करून तुम्हाला वाटेल तेव्हा मोईतो बनवून पिऊ शकता.
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट, लहान मुलं खातील आवडीने