Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी ‘अंडा भुर्जी’, चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Egg Bhurji Recipe : अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने,जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. स्ट्रीटवर मिळते तशी मसालेदार अंडा भुर्जी तुम्ही घरीदेखील अगदी सहज तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2026 | 09:30 AM
Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी 'अंडा भुर्जी', चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा गाडीवर मिळते तशी 'अंडा भुर्जी', चवीसोबत आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Follow Us
Follow Us:
  • सकाळच्या नाश्त्यासाठी अंडा भुर्जी एक लोकप्रिय पदार्थ ठरतो.
  • तूपात भाजलेला पाव आणि त्याच्यासोबत भुर्जी.. हे काॅम्बीनेशनच न्यारं.
  • तुम्ही अगदी स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी घरीदेखील बनवू शकता.
भारतातील प्रत्येक शहरात रस्त्याच्या कडेला लागलेल्या फूड स्टॉलवर मिळणारी स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी ही अनेकांची आवडती डिश आहे. मसालेदार चव, बटरचा सुगंध, भरपूर कांदा-टोमॅटो आणि कोथिंबिरीची सजावट यामुळे ही भुर्जी साध्या घरगुती भुर्जीपेक्षा वेगळी आणि अधिक चविष्ट लागते. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या झटपट जेवणापर्यंत कोणत्याही वेळी हा पदार्थ सहज बनवता येतो. घरच्या घरी अगदी हॉटेल किंवा स्टॉलसारखी चव मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात मसाले आणि अंडी जास्त शिजू न देणे महत्त्वाचे असते. काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी पाहुणे आले असतील किंवा झटपट काहीतरी चविष्ट बनवायचे असेल, तर उत्तम पर्याय ठरते.

Monsoon Special Recipe: पावासाळ्यात एकदा तरी घरी नक्की बनवा कुरकरीत आणि स्वादिष्ट ‘मिरची भजी’

साहित्य

  • 4 अंडी
  • 2 मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
  • 2 टोमॅटो (बारीक चिरलेले)
  • 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • 2 टेबलस्पून बटर
  • 1 टेबलस्पून तेल
  • ½ टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • ½ टीस्पून धने-जिरे पूड
  • ½ टीस्पून गरम मसाला
  • ¼ टीस्पून पावभाजी मसाला (ऑप्शनल)
  • चवीनुसार मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • लिंबाचा रस
कांदा-लसूणचा वापर न करता अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा लाल भोपळ्याचे चविष्ट भरीत, पचनासाठी अतिशय हलका पदार्थ

कृती

  • एका तव्यावर तेल आणि बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेले कांदे घालून सोनेरी होईपर्यंत परता.
  • आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून एक मिनिट परता. त्यानंतर टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवा.
  • हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड, गरम मसाला, पावभाजी मसाला आणि मीठ घालून मसाला नीट परता.
  • एका भांड्यात अंडी फोडून हलके फेटा आणि तयार मसाल्यावर ओता.
  • मध्यम आचेवर सतत हलवत अंडी मसाल्यात मिसळा. अंडी जास्त कोरडी होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • भुर्जी जवळपास तयार झाल्यावर थोडे बटर, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिसळा.
  • गरमागरम स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी बटर लावलेल्या पाव, ब्रेड, चपाती किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा. वरून थोडी कोथिंबीर आणि बटर घातल्यास चव आणखी खुलते.
 

Web Title: Make street style egg bhurji at home morning breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • egg recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
2

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
3

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
4

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.