Mirchi Bhaji Recipe : पावसाळ्याचे थंडगार वातावरण आणि कुरकुरीत मिरची भज्यांची मजाच काही न्यारी. एकदम स्ट्रीट स्टाईल मिरची भजी घरी बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या कामाची ठरेल.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मिरची भजी तर सर्वानाच खायला फार आवडतात.
पावासाळ्यात भजी खाण्याची मजा काही वेगळीच.
तुम्ही घरीच पावासाळ्याच्या या सीजनमध्ये कुरकरीत मिरची भजी बनवू शकता.
पावसाळ्याच्या दिवसांत गरमागरम चहा आणि त्यासोबत खुसखुशीत मिरची भजी मिळाली तर त्याची चव काही वेगळीच असते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर असलेली ही भजी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आवर्जून बनवली जातात. मोठ्या हिरव्या भजीच्या मिरच्यांपासून तयार होणारी ही रेसिपी तिखट असली तरी योग्य मसाल्यांमुळे तिची चव संतुलित राहते. पारंपरिक पद्धतीने बनवलेली मिरची भजी सण, मेजवानी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठीही उत्तम पर्याय ठरते. हिरवी चटणी, चिंचेची गोड-तिखट चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर हे भजी अधिकच रुचकर लागतात. चला तर मग रेसिपीसाठी लागणारे साहित्य आज कृती जाणून घेऊया.
मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करा. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द्या. हवे असल्यास आतील बिया थोड्या काढून टाका.
एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, ओवा, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा घाला. त्यात थोडे-थोडे पाणी घालत गाठी नसलेले घट्ट पीठ तयार करा.
कढईत पुरेसे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल मध्यम आचेवर योग्य तापमानाला येऊ द्या.
प्रत्येक मिरची पूर्णपणे बेसनाच्या पिठात बुडवून सर्व बाजूंनी समान थर लागेल याची काळजी घ्या.
गरम तेलात मिरच्या सावकाश सोडा. मध्यम आचेवर सर्व बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळलेली भजी टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल आणि भजी अधिक खमंग लागतील.