Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anda Ghotala Recipe: सुरतची सुप्रसिद्ध डिश अंडा घोटाळा कधी खाल्ला आहे का? नाही… तर लगेच नोट करा रेसिपी

तेच तेच अंड्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा सुरतचा हा फेमस पदार्थ नक्की बनवून पहा. अंडी, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांपासून तयार केलेला हा पदार्थ पाव अथवा चपाती-भाकरीसह खाण्यासाठी सर्व्ह केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2025 | 12:11 PM
Anda Ghotala Recipe: सुरतची सुप्रसिद्ध डिश अंडा घोटाळा कधी खाल्ला आहे का? नाही... तर लगेच नोट करा रेसिपी

Anda Ghotala Recipe: सुरतची सुप्रसिद्ध डिश अंडा घोटाळा कधी खाल्ला आहे का? नाही... तर लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

अंडा घोटाळा हा एक भारतीय पदार्थ आहे जो सुरतमध्ये खास करून खूप लोकप्रिय आहे. हा पदार्थ अंडी, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांपासून बनवला जातो. या पदार्थात सर्व साहित्य एकत्र करून त्यांचे मिश्रण तयार केले जाते ज्यामुळे त्याला घोटाळा म्हणजेच गोंधळ असे नाव देण्यात आले आहे. अंडा घोटाळा ही एक स्वादिष्ट आणि प्रोटीनने भरलेली डिश आहे.

दिवसाची सुरुवात होईल आनंदी! १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतील नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे

अंड्यापासून अनेक नवनवीन पदार्थ बनवले जातात मात्र तुम्हाला तेच तेच जुने पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अंड्याची ही हटके रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. मसाल्यांमध्ये मिसळेल अंड्याचा किस आणि त्यांचे संमिश्र चवीला फार अप्रतिम लागते.अंडा घोटाळा तुम्ही भाकरी, पोळी किंवा पावासोबत खाऊ शकता. ही रेसिपी खास करून रात्रीच्या जेवणासाठी किंवा पार्टीत चमचमीत काही हवे असेल तर उत्तम पर्याय आहे. चला तर मग त्वरित जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • ४ उकडलेली अंडी
  • २ कच्ची अंडी
  • २ मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
  • २ मध्यम टोमॅटो (बारीक चिरलेले)
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • १ चमचा लाल तिखट
  • ½ चमचा हळद
  • १ चमचा गरम मसाला
  • १ चमचा धणे-जिरे पावडर
  • मीठ चवीनुसार
  • २ चमचे तेल
  • थोडी कोथिंबीर
स्पेशल पार्टीसाठी, स्पेशल नाश्ता! घरी बनवा डॉमिनोज स्टाईल Pizza Pocket; चव चाखताच सर्व होतील खुश

कृती:

  • अंडा घोटाळा तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या
  • त्यानंतर आता त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून २ मिनिटं परतून घ्या
  • टोमॅटो घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा
  • नंतर हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून मसाला चांगला परतून घ्या
  • त्यात एक उकडलेली अंडी किसून यात घाला आणि मसाल्यांमध्ये छान परतून घ्या
  • नंतर कढईच्या एका बाजूला जागा करून कच्ची अंडी फोडून घाला आणि हलक्या हाताने भुर्जी करा
  • भुर्जी तयार झाल्यावर सगळं एकत्र मिक्स करा
  • थोडं पाणी घालून गरमागरम अंडा घोटाळा २-३ मिनिटं शिजू द्या आणि मग गॅस बंद करा
  • शेवटी वरून कोथिंबीर घाला आणि तयार अंडा घोटाळा खाण्यासाठी सर्व्ह करा
  • हा अंडा घोटाळा पावासोबत खूपच छान लागतो. हव असल्यास त्यात थोडं चीजही घालू शकता.

Web Title: Make surat special anda ghotala at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • egg recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
3

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
4

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.