Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Recipe : चीजी पनीर ब्रेड रोल हा एक असा पदार्थ आहे जो पाहता क्षणीच तोंडाला पाणी आणतो. ही रेसिपी घरातील सर्वांनाच विशेषत: लहान मुलांच्या पसंतीस पडेल. काही हटके आणि टेस्टी बनवायचे असल्यास ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2026 | 09:35 AM
Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा 'चीजी पनीर ब्रेड' रोल रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळच्या नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा 'चीजी पनीर ब्रेड' रोल रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • आज आपण चीजी पनीर ब्रेड रोल रेसिपी जाणून घेत आहोत.
  • ही रेसिपी लहान मुलांना नक्कीच आवडेल.
  • पार्टी स्नॅक्ससाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल.
संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली की  चिजी पनीर ब्रेड रोल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चीज म्हणजे लहान मुलांचा आवडीचा पदार्थ. कोणत्याही पदार्थात तुम्ही चीज घातले की तो पदार्थ लहान मुलांनी खाल्लाच अस समजा. घरातील साध्या पदार्थांपासून झटपट तयार होणारा हा स्नॅक बाहेरून खमंग आणि क्रिस्पी, तर आतून मऊ, मसालेदार आणि चीज़ी लागतो. मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठीही ही रेसिपी करून पाहता येईल. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने

 साहित्य

  • पनीर – २५० ग्रॅम
  • चीज – १०० ग्रॅम
  • हिरवी मिरची – २
  • किसलेले आले – १ छोटा चमचा
  • बारीक चिरलेला कांदा – १ मूठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – १ मूठ
  • ओरेगॅनो – १ चिमूट
  • चिली फ्लेक्स – १ चिमूट
  • मीठ – चवीनुसार
  • सॅंडविच ब्रेड – आवश्यकतेनुसार
  • तळण्यासाठी तेल
Ukadiche Modak Recipe: मोदकांना द्या सुंदर कळीदार आकार! प्लास्टिकच्या पिशवीची ही ट्रिक पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’

कृती

  • सर्वप्रथम पनीर हाताने किंवा काट्याच्या मदतीने व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यामध्ये किसलेले चीज, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले, कांदा आणि कोथिंबीर घाला. त्यानंतर ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत नीट मिसळा. पनीरचे स्वादिष्ट आणि चीज़ी स्टफिंग तयार आहे.
  • आता ब्रेडच्या स्लाइसचे चारही कडे चाकूने कापून काढा. यामुळे ब्रेडला सहज आकार देता येतो आणि रोल व्यवस्थित बंद करता येतो. कडे राहिल्यास ब्रेड नीट सील न होण्याची शक्यता असते.
  • एक ब्रेड स्लाइस घ्या आणि दोन्ही बाजूंनी हलकेच पाण्यात भिजवा. लगेच तो स्लाइस दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये ठेवून त्यातील अतिरिक्त पाणी अलगद दाबून काढा. ब्रेड पूर्णपणे सपाट आणि मऊ झाला पाहिजे. मात्र तो जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, अन्यथा ब्रेड फाटू शकतो.
  • आता तयार केलेले पनीर-चीज स्टफिंग थोडे घ्या आणि हाताने घट्ट एकत्र करून ब्रेडच्या मध्यभागी ठेवा. ब्रेडच्या कडा एकमेकांकडे आणत स्टफिंग पूर्णपणे झाकून टाका. हाताच्या तळव्याने हलकेच दाब देत रोलला अंडाकृती किंवा गोलाकार आकार द्या.
  • रोल तयार करताना त्यावर कुठेही भेग किंवा उघडी जागा राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. सर्व रोल याच पद्धतीने तयार करून बाजूला ठेवा.
  • कढईमध्ये पुरेसे तेल घेऊन ते मध्यम-तेज आचेवर गरम करा. तेल तापल्यानंतर एकावेळी ३ ते ४ रोल सावधपणे तेलात सोडा. रोल बाहेरून कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. तळताना सतत उलटापालटा करू नका, त्यामुळे रोल फुटण्याची शक्यता कमी राहते.
  • तळलेले पनीर ब्रेड रोल टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम रोल टोमॅटो सॉस, हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडीच्या डिपसोबत सर्व्ह करा.

Web Title: Make tasty and cheesy paneer bread roll at home note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने
1

Food Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा टेस्टी Paneer Sandwich, लहान मुलांसह सगळेच खातील आवडीने

नारळीपोर्णिमेनिमित्त बनवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चविष्ट करंज्या, नोट करून घ्या रेसिपी
2

नारळीपोर्णिमेनिमित्त बनवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहणाऱ्या ओल्या खोबऱ्याच्या चविष्ट करंज्या, नोट करून घ्या रेसिपी

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
3

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी
4

Veg Mutton Biryani Recipe : श्रावणात अशाप्रकरे बनवून खा ‘व्हेज मटण बिर्याणी’, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.