Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Recipe : तुम्हाला माहितीये का? तुम्ही कच्च्या केळीपासून फक्त कुरकुरीत चिप्सच नाही तर चविष्ट असे कोफ्ते देखील तयार करु शकता. हे कोफ्ते फार झटपट तयार होतात. इंस्टाग्रामवर शेफने याची रेसिपी शेअर केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 03:03 PM
Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्टे ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्टे ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • कच्च्या केळीचे कोफ्ते बनवा घरीच.
  • चवीला लागतात मजेदार.
  • रेसिपी आहे फार सोपी आणि झटपट.
कोफ्ते हा पदार्थ अधिकतर वेळी पनीर किंवा दुधीपासून तयार केला जातो. पण तुम्ही कधी कच्च्या केळीपासून कोफ्ते तयार करुन खाल्ले आहेत का? अनेकांना ठाऊक नाही पण तुम्ही कच्च्या केळीपासून फक्त चिप्स नाही तर कुरकुरीत आणि रुचकर चवीचे कोफ्ते देखील तयार करु शकता. तुम्ही हे कोफ्ते संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ग्रेव्हीत टाकून रात्रीच्या जेवणासाठी सर्व्ह करु शकता.

शेफ अरुणा विजयने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कच्च्या केळीच्या कोफ्त्याची रेसिपी शेअर केली आहे. हिच रेसिपी आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. मुख्य म्हणजे यात लसूण किंवा कांद्याचा वापर केला जात नाही. नेहमीचं बोरींग जेवण खाऊन कंटाळा आला असेल आणि घरी काही नवीन बनवण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. चला वेळ न घालवता यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • कच्चे केळे-२
  • काजू – १ मोठा चमचा
  • मनुका – १ मोठा चमचा
  • ताजा पुदिना – काही पाने
  • ताजी कोथिंबीर – काही पाने, चिरलेली
  • हिरवी मिरची – १, बारीक चिरलेली
  • डाळिंबाचे दाणे – २ मोठे चमचे
  • वाटाणे – २ मोठे चमचे
  • हळद – १ चमचा
  • लाल मिरची पावडर – १ मोठा चमचा
  • धणेपूड – १ मोठा चमचा
  • गरम मसाला – १ चमचा
  • चाट मसाला – १ चमचा
पिठासाठी लागणारे साहित्य
  • बेसन – १ कप
  • मीठ – चवीनुसार
  • लाल मिरची पावडर – १ चमचा
  • हळद – १/२ चमचा
  • ओवा – १/२ चमचा
  • बेकिंग सोडा – १/४ चमचा
  • पाणी – आवश्यकतेनुसार
कृती
  • फिलिंग तयार करण्यासाठी सर्वात आधी केळ्यांना उकळून त्यांना सोलून घ्या आणि मग केळ्यांना मॅश करा.
  • एका बाऊलमध्ये मॅश केलेली केळी, मीठ, बारीक केलेले काजू, मनुका, पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, डाळिंबाचे दाणे, वाटाणे आणि सर्व सुके मसाले व्यवस्थित एकत्र करा.
  • सर्व गोष्टी जेव्हा नीट एकत्रित मिसळतील तेव्हा तयार मिश्रणाचे लहान गोळे तयार करा.
  • दुसऱ्या भांड्यात बेसन, मीठ, लाल तिखट, हळद, ओवा आणि सोडा एकत्र करा. नंतर, हळूहळू पाणी घालून एकजीव, किंचित जाडसर मिश्रण तयार करा.
  • आता कढईत तेल गरम करा.
  • तेल चांगले तापले की, बेसनाच्या मिश्रणात तयार गोळे घोळवून गरम तेलात मध्यम आचेवर त्यांना कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार कुरकुरीत कोफ्त्यांना तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.
  • जर तुम्हाला कोफ्त्यांची रसरशीत भाजी तयार करायची असेल तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांदा, लसूण, काजू, मिरची आणि टोमॅटो घालून एक बारीक पेस्ट तयार करुन घ्या.
  • तेलात ही पेस् परतून घ्या आणि मग त्यात मीठ, धणेपूड, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रव्ही तयार करा.
  • ही ग्रेव्ही छान शिजली की त्यात तयार कोफ्ते घाला आणि भाजी चपाती किंवा भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: Make tasty and crispy raw banana kofta at home note the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
1

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
2

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
3

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
4

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.