Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Kurkure Chaat Recipe : मागील काही काळापासून क्रस्पी कुरकुरे चाट खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. पार्टी स्नॅक किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरते. शिवाय अवघ्या पाच मिनिटांतच ही चाट बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2026 | 09:27 AM
Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार 'कुरकुरे चाट'

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार 'कुरकुरे चाट'

Follow Us
Follow Us:
  • संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही हटके होऊन जाऊद्यात.
  • घरी बनवा टेस्टी आणि कुरकुरीत कुरकुरे चाट.
  • याची चव घरातील सर्वांनाच करेल खुश.
कुरकुरीत, चटपटी आणि झटपट तयार होणारी चाट खाण्याची इच्छा झाली की कुरकुरे चाट हा एक भन्नाट पर्याय ठरू शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्या, चटण्या आणि मसाल्यांच्या मदतीने ही चाट काही मिनिटांत तयार करता येते. कुरकुरे, कांदा, टोमॅटो आणि शेव यामुळे या चाटला वेगवेगळ्या चवी आणि टेक्सचरचा सुंदर मेळ मिळतो. याची चटकदार आणि क्रिस्पी चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडते. संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा घरच्या घरी काहीतरी वेगळे खायचे असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहा. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

साहित्य

  • कुरकुरे – १ मोठे पाकीट
  • बारीक चिरलेला कांदा – १
  • बारीक चिरलेला टोमॅटो – १
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ चमचे
  • हिरवी चटणी – १ मोठा चमचा
  • गोड चिंच-खजूर चटणी – १ मोठा चमचा
  • चाट मसाला – १ चमचा
  • लाल तिखट – अर्धा चमचा
  • बारीक शेव – अर्धी वाटी
  • डाळिंबाचे दाणे – २ चमचे
  • लिंबाचा रस – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

कृती

  • सर्वप्रथम कुरकुरे एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यांचे साधारण छोटे तुकडे करा.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिसळा.
  • आता त्यात हिरवी चटणी आणि गोड चिंच-खजूर चटणी घाला. चटणीचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
  • चाट मसाला, लाल तिखट आणि थोडे मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
  • त्यावर लिंबाचा रस आणि डाळिंबाचे दाणे घालून पुन्हा हलकेच मिसळा.
  • शेवटी कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी बारीक शेव घाला आणि लगेच सर्व्ह करा.
  • तयार कुरकुरे चाटवर थोडी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सजवा. चटपटीत कुरकुरे चाट ताजेच खाल्ल्यास त्याची चव आणि कु रकुरीतपणा अधिक छान लागतो.

Web Title: Make tasty kurkure chaat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.