Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या रक्षाबंधनाला तुमच्या भावासाठी बनवा ‘ही’ खास घरगुती मिठाई! वाचा सोपी रेसिपी

रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ त्याच्या बहिणीला काही ना काही गिफ्ट देत असतो. तर बहिणीला देखील तिच्या भावासाठी काही खास करण्याची इच्छा असते. या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या भावासाठी मिल्क केक तयार करू शकता. घरच्या घरी आणि अगदी सोप्या पध्दतीने तुम्ही हा मिल्क केक तयार करू शकता. त्यामुळे तुमच्या रक्षबंधनाचा सण आणखी खास होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 10, 2024 | 03:37 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

रक्षाबंधन हा सण प्रत्येक भाऊ – बहिणीसाठी अतिशय खास असतो. सर्वजण मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. यंदा ऑगस्ट महिन्यात रक्षबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ त्याच्या बहिणीला काही ना काही गिफ्ट देत असतो. तर बहिणीला देखील तिच्या भावासाठी काही खास करण्याची इच्छा असते. पण भावासाठी नक्की करायचं, हा मोठा प्रश्न असतो. या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या भावासाठी मिल्क केक तयार करू शकता. घरच्या घरी आणि अगदी सोप्या पध्दतीने तुम्ही हा मिल्क केक तयार करू शकता. त्यामुळे तुमच्या रक्षबंधनाचा सण आणखी खास होईल. चला तर मग जाणून घेऊया मिल्क केक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 2 लीटर दूध
  • लिंबाचा रस
  • 2 चमचे दही
  • 200 ग्रॅम साखर
  • 50 ग्रॅम तूप
  • 50 ग्राम काजू
  • 2 छोटे चमचे वेलची पावडर
मिल्क केक रेसिपी

मिल्क केक बनवण्यासाठी तुम्हाला एक जड तळाचा पॅन घ्यावा लागेल. सर्वात आधी या पॅनमध्ये दूध ओतून मध्यम आचेवर उकळून घ्या. चांगली उकळी आल्यावर आच कमी करा आणि दूध सतत फेटत राहा. जेव्हा हे दूध अर्धे कमी होईल तेव्हा पॅनच्या काठावर तयार केलेली मलई बाजूला काढून ठेवा. आता या दुधात थोडा लिंबाचा रस घाला आणि नंतर दही घाला आणि सर्व मिक्स करा. आता हे दूध पुन्हा उकळून घ्या. आता हे दूध एका कपड्याने गाळून घ्या. आता दुधाचा गोळा तयार होईल. हा गोळा एका कपड्याने घट्ट बांधून घ्या आणि जड वस्तूने दाबा.

आता एका पॅनमध्ये तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये दुधाचा गोळा घालून मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे परतून घ्या. आता या मिश्रणामध्ये साखर घालून मिक्स करा. साखर वितळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवा. तुम्हाला तुमचा मिल्क केक अधिक रुचकर बनवण्यासाठी त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार त्यात वेलची पावडर, केशर किंवा पिस्ता पावडर टाकू शकता. आता एक ट्रे घ्या, त्यावर थोडं तूप लावा, नंतर हे मिश्रण त्या ट्रेवर ओतून पसरवा. तुम्हाला हव्या त्या आकारात केकचे तुकडे करून हा ट्रे काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुमचा मिल्क केक तयार होईल.

Web Title: Make this special homemade sweet for your brother this rakshabandhan read the easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • milk recipe

संबंधित बातम्या

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी
1

नेहमीच्या चाॅकलेट केकला विसरा, यंदा घरी बनवा हेल्दी, फ्रेश आणि चविष्ट असा ‘फ्रुट केक’, रेसिपी आहे फार सोपी

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
2

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : दररोजच्या भाज्यांना कंटाळलात? मग घरी बनवा राजस्थानी स्टाईल चटपटीत ‘दही मिरची’
3

Recipe : दररोजच्या भाज्यांना कंटाळलात? मग घरी बनवा राजस्थानी स्टाईल चटपटीत ‘दही मिरची’

उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत
4

उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.