या गोकुळष्टमीला करा दहीकाला पौष्टिक, आणि झटपट साहित्य: ३ वाट्या साळीच्या लाह्या २ वाट्या ज्वारीच्या लाह्या अर्धी वाटी चण्याची डाळ १ पेरू १ काकडी २ वेलची केळी किंवा १ साधं केळं २-३ कमी तिखट हिरव्या मिरच्या भरपूर कोथिंबीर १ टेबलस्पून गोड लोणचं १ टेबलस्पून तिखट लोणचं दही लागेल फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, मीठ आणि साखर चवीनुसार कृती काला करण्याआधी २ तास चण्याची डाळ भिजवून ठेवा. दोन्ही लाह्या गॅसवर किंचित भाजून घ्या. नंतर आपल्याला त्या दह्यातच कालवायच्या. काकडी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या. केळीही बारीक चिरा. पेरू जाड किसणीनं किसून घ्या. काला करण्यासाठी एका मोठ्या टोपल्यात दोन्ही लाह्या, चिरलेलं साहित्य, गोड आणि तिखट लोणचं, लागेल तसं दही, साखर, मीठ असं सगळं घाला. नीट कालवून घ्या. वरून हिंग मोहरीची खमंग फोडणी घाला.