
Dark Circles: ८ तास झोपूनही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या खरी कारणे
स्पर्म काउंट म्हणजे वीर्यामध्ये असलेल्या शुक्राणूंची संख्या. शुक्राणूंची संख्या कमी असल्यास स्त्रीबीजापर्यंत शुक्राणू पोहोचण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या गर्भधारणा (Pregnancy) होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, कमी स्पर्म काउंट म्हणजे कायमचे वंध्यत्व असे नाही.
अनहेल्दी डाएट धूम्रपान, मद्यपान, व्यसन, लठ्ठपणा, सततचा मानसिक ताण, झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यांचा शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय हार्मोन्समधील असंतुलन, व्हेरिकोसील, इन्फेक्शन, काही औषधांचा दीर्घकालीन वापर, मधुमेह किंवा इतर दीर्घकालीन आजारही यामागील कारणे असू शकतात.
अनेक पुरुषांमध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र, दीर्घकाळ प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे, शारिरीक संबध ठेवण्याच्या इच्छेत घट, इरेक्शनसंबंधी समस्या, वीर्याचे प्रमाण कमी वाटणे, टेस्टिकल्समध्ये वेदना किंवा सूज, तसेच चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील केसांच्या वाढीत बदल अशी काही लक्षणे दिसू शकतात.
स्पर्म काउंटची तपासणी करण्यासाठी सीमन अॅनालिसिस (वीर्य तपासणी) केली जाते. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यानुसार हार्मोनल टेस्ट, शारीरिक तपासणी, अल्ट्रासाऊंड किंवा इतर वैद्यकीय चाचण्याही केल्या जाऊ शकतात. अचूक कारण समजल्यानंतर उपचार निश्चित केले जातात.
उपचार हे समस्येच्या कारणावर अवलंबून असतात. काहींना औषधोपचार, हार्मोन थेरपी किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. त्याचबरोबर संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य वजन राखणे, धूम्रपान व मद्यपान टाळणे, पुरेशी झोप घेणे आणि तणाव नियंत्रणात ठेवणे यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. कोणतीही वेगळी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
चाळीशीनंतरही चेहरा दिसेल टवटवीत? अँटी-एजिंग क्रीमची गरज नाही! घरच्या घरी बनवा नैसर्गिक कोलाजन क्रीम