Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Men’s Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश ‘दही के शोले’

Dahi Ke Sholey Recipe : दही के शोले ही उत्तर प्रदेशातील एक लोकप्रिय डिश आहे. यात मऊदार दहीची स्टफिंग ब्रेडमध्ये रोल केली जाते आणि मग यांना तेलात फ्राय केलं जात. चवीला ही डिश फार अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 19, 2025 | 10:53 AM
Men's Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश 'दही के शोले'

Men's Day 2025 : घरातील पुरुषांना करा खुश, खास दिनानिमित्त घरी बनवा युपीची फेमस डिश 'दही के शोले'

Follow Us
Follow Us:

आज १९ नोव्हेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day) साजरा केला जात आहे. हा दिवस पुरुषांना समर्पित असून आपल्या आयुष्यातील आपला प्रियकर असो, भाऊ असो वा वडील तुम्ही या दिवशी त्यांना एक खास भेटवस्तू गिफ्ट करू शकता. गिफ्ट हे नेहमीच खरेदी करता येत नाही तर ते कधीकधी घरी बनवताही येते. पुरुष दिनाच्या या खास प्रसंगी आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी पण चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीने तुम्ही तुमच्या आयुष्यातील आवडीच्या पुरुषांना खुश करू शकता.

थंडगार वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी बाजरीच्या पिठाच्या हलवा, नोट करून घ्या रेसिपी

भारतीय पाककलेत दूध, दही, पनीर, मैदा, बेसन यांसारख्या साध्या पण पौष्टिक पदार्थांपासून तयार होणाऱ्या असंख्य रुचकर रेसिपी आढळतात. उत्तर भारतातील अनेक राज्यांत बनवला जाणारा दही के शोले हा असा एक लोकप्रिय स्टार्टर आहे, जो चवीला कुरकुरीत, आतून नरम आणि दह्याच्या ताजेपणामुळे हलका वाटतो. दही, भाज्या व मसाल्यांचा विलक्षण संगम आणि बाहेरून तळलेली कुरकुरीत आवरण ही त्याची विशेष ओळख. हे स्टार्टर पार्ट्या, सण, घरगुती समारंभ किंवा खास पाहुण्यांसाठी बनवले तरी उत्तम ठरते.

शोले नाव असूनही ही डिश अत्यंत सौम्य आणि सुगंधी चवीची असते. तोंडात विरघळणारे दही आणि भाज्यांची भुरभुरीत चव, त्यावर मिळणारा गरमागरम तळलेला पोत हा अनुभव नक्कीच प्रत्येकाला आवडतो. घरी बनवताना स्वच्छ साहित्य, ताजे दही आणि योग्य प्रमाणात मसाले वापरल्यास रेस्टॉरंटसारखा कुरकुरीत आणि स्वादिष्ट परिणाम मिळतो. या डिशचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती अगोदर तयार करून ठेवता येते व सर्व्ह करताना फक्त तळायची, यामुळे ती घरगुती समारंभात खूप उपयोगी ठरते.

साहित्य

  • ताजे दही – १ कप (घट्ट, पाणी काढलेले)
  • पनीर – १ कप (किसलेले किंवा चुरलेले)
  • ब्रेडचे कडा काढलेले तुकडे – ८ ते १०
  • कांदा – १ (बारीक चिरलेला)
  • हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेल्या)
  • कोथिंबीर – २ टेबलस्पून (चिरलेली)
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • गरम मसाला – १/२ टीस्पून
  • जिरे पूड – १/२ टीस्पून
  • चवीनुसार मीठ
  • तेल – गरजेप्रमाणे
Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

कृती

  • सर्वप्रथम दही कपड्यात घालून पाणी पूर्णपणे काढून घ्या, म्हणजे दही घट्ट होईल.
  • एका मोठ्या बाऊलमध्ये घट्ट दही, पनीर, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे पूड, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले एकत्र करा.
  • हा मिश्रण खूप पातळ नको. जर पातळ वाटत असेल तर थोडेसे किसलेले पनीर किंवा ब्रेडचा चुरा मिळवून घट्ट करा.
  • हे मिश्रण १० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  • ब्रेडच्या स्लाईसचे कडे काढून स्लाईस थोडे पातळ लाटून घ्या.
  • प्रत्येक ब्रेड स्लाईसमध्ये १ ते २ टेबलस्पून दहीचे मिश्रण भरा.
  • स्लाईसचे दोन्ही बाजू एकत्र आणून घट्ट रोल करा किंवा त्रिकोणी आकार द्या.
  • बाजूंना थोडे पाणी लावून दाबा, जेणेकरून तळताना भरावा बाहेर येणार नाही.
  • सर्व रोल किंवा पॅटिस सारखे तयार करून ५ मिनिटे बाजूला ठेवा.
  • आता कढईत तेल गरम करा.
  • मध्यम आचेवर ब्रेड रोल सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तेल निथळण्यासाठी टिश्यू पेपरवर काढा.
  • गरमागरम दही के शोलेंना हिरवी चटणी, लसूण चटणी किंवा टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.

Web Title: Mens day 2025 make uttar pradesh famous dish dahi ke sholey at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • International Mens Day
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
1

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
3

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
4

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.