Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. खोबरेल तेलात कढीपत्त्याची पाने मिक्स करून केसांना लावल्यास केस चमकदार होण्यासोबतच मजबूत होतील. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2026 | 03:40 PM
केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा 'ही' हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा 'ही' हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यास केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येतात. सगळ्यांचं आपले केस सुंदर, घनदाट, लांबसडक, काळेभोर हवे असतात. पण केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात, ज्याच्या परिणामामुळे कितीही सुंदर हेअर स्टाईल केली तरी चांगली दिसत नाही. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा महिला शाम्पू किंवा कंडिशर बदलून पाहतात. पण वारंवार केमिकल युक्त शाम्पू कंडिशनरचा वापर केल्यामुळे केस आणखीनच कोरडे होऊन जातात. हेअर बोटॉक्स किंवा केराटीन केल्यानंतर केस काही काळापुरते अतिशय चमकदार आणि सुंदर राहतात. पण पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात. त्यामुळे केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा झाल्यास कोणत्याही ट्रीटमेंट करू नये.(फोटो सौजन्य – istock)

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण खूप जास्त प्रमाणात केस गळत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. आज आम्ही तुम्हाला केसांच्या लांबलचक वाढीसाठी खोबरेल तेलात कोणती पाने मिक्स करून लावावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.यामुळे केसांची झपाट्याने वाढ होईल आणि केस नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर दिसतील. केस विंचरताना केसांचा गुंता हात येत असेल तर दुर्लक्ष न करता केसांची योग्य काळजी घ्यावी.

केस गळती थांबवण्यासाठी टोपात खोबरेल तेल घेऊन गरम करा आणि त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घालून काहीवेळ गरम करून पाने तशीच ठेवून द्या. तयार केलेले तेल बाटलीमध्ये भरून ठेवा. तेल केसांना लावण्याआधी केस विंचरून घ्या आणि केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे तेलाने मसाज करा. नियमित किंवा आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांना कढीपत्याच्या पानांचे तेल लावल्यास केस अतिशय मजबूत होण्यासोबतच चमकदार आणि सुंदर होतील. तेल लावून रात्रभर तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमचे केस मऊ आणि सॉफ्ट होण्यास मदत होईल.

केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ

कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी तेल केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून ठेवा. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमीनो ॲसिड असतात, ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते. केस चमकदार आणि सुंदर करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. बी-कॉम्प्लेक्स’ आणि प्रोटीन युक्त तेलाने केसांच्या मुळांवर मसाज केल्यास केस चमकदार होण्यासोबतच घनदाट सुद्धा होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mix these green leaves with coconut oil to reduce hair fall and boost hair growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
1

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? ‘या’ पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर
2

सतत होणाऱ्या गॅसमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? ‘या’ पद्धतीने करा हिंगाचे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
3

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ
4

केस होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, महिनाभरात केसांची होतील झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.