Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी विटामिन ई कॅप्सूलमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांची वाढ होईल भरभर

केसांच्या सुंदर वाढीसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र केसांच्या वाढीसाठी केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया केसांच्या वाढीसाठी कोणते उपाय करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 14, 2025 | 09:52 AM
केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी विटामिन ई कॅप्सूलमध्ये मिक्स करा 'हे' पदार्थ

केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी विटामिन ई कॅप्सूलमध्ये मिक्स करा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

सुंदर आणि लांबलचक केस महिलांच्या सौंदर्यात भर पडतात. पण वातावरणातील बदलांमुळे आणि केसांना सूट न होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे केसांना सूट होतील अशाच प्रॉडक्टचा वापर केसांसाठी करावा. अनेक महिला, मुली केस कोरडे किंवा निस्तेज झाल्यानंतर केसांवर केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र सतत केलेल्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब होऊन जातात. त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांवर घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे केस नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होतात. शिवाय केसांची वाढ चांगली होते. केसांच्या वाढीसाठी आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केसांना विटामिन ई कॅप्सूल लावावी.(फोटो सौजन्य – iStock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी विटामिन ई कॅप्सूलचा वापर करावा. यामुळे केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. खराब झालेले केस पुन्हा सुधारण्यास मदत होईल. विटामिन ई कॅप्सूलचा वापर केसांसह त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो. पण चुकीच्या पद्धतीने विटामिन ई कॅप्सूलचा वापर केल्यास केसांमध्ये कोणताच फरक दिसून येणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांमध्ये विटामिन ई मिक्स करून केसांना लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

खोबरेल तेल:

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल अतिशय प्रभावी आहे. खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. शिवाय केस लांबलचक होण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेलात विटामिन ई कॅप्सूल मिक्स करून लावल्यास केस सुंदर आणि चमकदार दिसतील. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. तयार केलेल्या तेलाचा वापर केसांच्या मुळांना मसाज करण्यासाठी करावा. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील.

दही:

केसांच्या वाढीसाठी आणि सुंदर केसांसाठी दही वापरल्यास केस सुंदर आणि चमकदार होतील. यासाठी २ चमचे दही घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल मिक्स करावी. जेल सारखे मिश्रण तयार झाल्यानंतर संपूर्ण केसांच्या मुळांवर मिश्रण लावून केसांना हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे केस मऊ आणि मजबूत होतील. दही केसांच्या वाढीसाठी अतिशय महत्व आहे.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

कोरफड जेल:

कोरफड जेलचा वापर त्वचेसह केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जात आहे. यामध्ये असलेले गुणधर्म केस सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात. यासाठी कोरफड जेलमध्ये विटामिन ई कॅप्सूल मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण केसांवर लावून काहीवेळ ठेवून नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे केसांची वाढ निरोगी होईल आणि केस सुंदर दिसतील.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Mix this ingredient in vitamin e capsules to get relief from hair problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • Vitamin E

संबंधित बातम्या

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा
1

Anti Ageing Collagen Gel: चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील गायब! १० रूपयांमध्ये घरीच बनवा कोलोजन जेल, त्वचेच्या समस्या होतील नाहीशा

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
2

Black Raisins: काळ्या मनुका खाल्यामुळे खरचं वजन कमी होत का? जाणून घ्या मनुका खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Hair Care Tips: महागड्या ट्रिटमेंटपेक्षा केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा कांद्याचा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार
4

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.