लिंबाचा वापर करून घरीच करा सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग
सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि आकर्षक दिसायचं असत. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. महिला शरीरावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी काहींना काही उपाय करत असतात. त्यातील प्रामुख्याने केस जाणारा उपाय म्हणजे वॅक्सिंग. शरीरावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंग करतात. शिवाय हल्ली बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध झाल्या आहेत. शरीरावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी लेझर ट्रीटमेंट केल्या जातात. यामुळे त्वचेवर असलेले केस कायमचे निघून जातात. प्रत्येक महिन्याला स्त्रिया हातापायांवरचे केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जाणून महागडे वॅक्सिंग करतात. पण सतत वॅक्सिंग केल्यामुळे त्वचा ताणली जाते. काही महिलांना वॅक्सिंग करण्याची भीती वाटते, अशावेळी महिला घरीच हातापायांचे नको असलेले केस काढतात.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरावर नको असलेले अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. वॅक्सिंग केल्यामुळे शरीरावर असलेले अतिरिक्त केस निघून जाण्यासोबतच टॅन सुद्धा कमी होतो. पण काहीवेळ वॅक्सिंग केल्यामुळे त्वचा लाल होणे. त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला वॅक्सिंग करण्यासाठी लिंबाचा वापर कसा करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सर्वप्रथम, वाटीमध्ये दोन लिंबाचा रस घेऊन त्यात बेकिंग सोडा आणि गरम करून घेतलेले पाणी मिक्स करून घ्या. नंतर त्यात गव्हाचे पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. वॅक्सिंग करण्यासाठी मिश्रण तयार आहे. या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग करू शकता.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
लिंबाचा वापर करून घरीच करा सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग
वॅक्सिंग करण्यासाठी तयार केलेले मिश्रण हातापायांवर लावून तुम्ही वॅक्सिंग करू शकता. यामुळे अनावश्यक केस सहज निघून येतील. अप्पर लिप्स किंवा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी तुम्ही लिंबाच्या मिश्रणाचा वापर करू शकता. तसेच या मिश्रणात टिशू पेपर बुडवून 3 ते 4 मिनिटे त्वचेवर तसाच ठेवून द्या. नंतर तयार केलेले मिश्रण अॅक्टिव्ह होऊन त्यावर लहान लहान बुडबुडे येऊ लागतील. हा उपाय केल्यास हातापायांवरचे केस सहज निघून येतील. या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग करू शकता. याशिवाय लिंबाच्या रसामुळे त्वचेवरील टॅन कमी होईल.