उन्हाळ्यात चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी कोरफडच्या रसात मिक्स करा स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढू लागते. यामुळे बऱ्याचदा आरोग्य आणि त्वचा बिघडण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स, मुरूम किंवा फोड येऊ लागतात. चेहऱ्यावर आलेले हेच छोटे मोठे फोड आणि पिंपल्स घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र चुकीचे प्रॉडक्ट वापरून त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची शकता असते. चेहरा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी कोणत्याही ब्युटी क्रीमचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरफडच्या रसाचा वापर करावा. यामध्ये असलेले घटक त्वचा कायम हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात केस सतत गळतात? केसांच्या वाढीसाठी ‘या’ तेलाचा नियमित करा वापर, केस होतील मजबूत
बऱ्याचदा महिला कोरफडचा रस, मध आणि खोबऱ्याचे तेल एकत्र करून त्वचेवर लावतात. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी आणि त्वचा उजळदार करण्यासाठी कोरफडच्या रसाचा वापर करावा. कोरफडच्या रसात अॅंटी-ऑक्सिडेंट, बीटा-कॅरोटीन, विटामिन सी आणि ई इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी कोरफडच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
त्वचेवर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी कोरफडचा रस वापरावा. यामध्ये खोबऱ्याचे तेल मिक्स करून त्वचेवर लावल्यास चेहरा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल. कोरफडच्या रसात विटामिन सी, ई आणि अॅंटी-ऑक्सिडेंट इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे चेहऱ्यावर आलेली सूज, पिंपल्स आणि पुरळ कमी होण्यास मदत होते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कोरफड जेल मदत करते.
उन्हामुळे किंवा वाढत्या पिंपल्समुळे चेहरा अतिशय खराब आणि काळवंडलेला दिसू लागतो. अशावेळी चेहऱ्यावर नियमित कोरफड जेल लावावे. यामुळे त्वचेचा रंग उजळदार दिसू लागेल आणि चेहरा स्वच्छ होईल. सनबर्न, टॅनिंग आणि पिगमेंटेशन इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेल आणि खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा.
लिपबाम लावूनही ओठ काळवंडलेले दिसतात? चमकदार ओठांसाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी
वाटीमध्ये ताज्या कोरफडचा रस घेऊन त्यात खोबऱ्याचे तेल मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळा तसेच ठेवा. कोरफडचे मिश्रण शक्यतो रात्री झोपताना चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा दीर्घकाळ फ्रेश आणि मुलायम राहण्यास मदत होते. त्वचेमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.