केसांच्या वाढीसाठी 'या' तेलाचा नियमित करा वापर
कडक उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचा, केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर संपूर्ण शरीराची योग्य काळजी घ्यावी. उन्हाळ्यात केस अधिक रुक्ष आणि कोरडे होऊ लागतात. सतत घाम आल्यामुळे केस चिकट आणि तेलकट होतात. केस चिकट झाल्यानंतर योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे किंवा केसांसंबधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. केसांचे आरोग्य खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे नियमित केसांची निगा राखणे आवश्यक आहे. अनेक महिला केसांच्या वाढीसाठी किंवा कोंडा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – iStock)
लिपबाम लावूनही ओठ काळवंडलेले दिसतात? चमकदार ओठांसाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी
केसांच्या वाढीसाठी केसांवर हेअर मास्क, हेअर सिरम, हेअर ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा केस निरोगी आणि चमकदार दिसत नाही. केसांमध्ये कोंडा किंवा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा महिला मानसिक तणावात जातात. ज्यामुळे आणखीनच केस गळू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोणते तेल अतिशय प्रभावी आणि गुणकारी आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या तेलाचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे.
मागील अनेक वर्षांपासून खोबरेल तेलाचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जात आहे. या तेलात असलेले गुणधर्म केसांना पोषण देतात. याशिवाय केस मजबूत करतात. त्यामुळे केस गळतीच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी केसांना नियमित खोबरेल तेलाने मसाज करावी. खोबरेल तेलाची मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केस चांगले दिसू लागतात. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि केस डीप कंडीशनींग होण्यासाठी केसांना खोबरेल तेल लावावे.
वारंवार केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केसांची वाढ खुंटते. त्यामुळे केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर एरंडेल तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे केसांमधील नैसर्गिक चमक वाढण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले रिसिनॉलिक अॅसिड स्काल्पचे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी मदत करते. एरंडेल तेलाचा वापर केल्यामुळे केसांची वाढ लवकर होते. मात्र केसांना एरंडेल तेल लावताना ते केसांना थेट लावू नये, यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. एरंडेल तेल लावताना खोबरेल तेलात किंवा इतर कोणत्याही तेलात मिक्स करून लावावे.
केसांच्या वाढीसाठी कांद्याच्या तेलाचा वापर केला जातो. कांद्याचे तेल केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये असलेले गुणधर्म केसांच्या मुळांना पोषण देतात. या तेलात असलेले सल्फर केस तुटण्यापासून वाचवतात आणि केसांची वाढ चांगली होते. कांद्याच्या तेलात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, हे गुणधर्म केसांना पोषण देतात.