चमकदार ओठांसाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये संपूर्ण शरीरासह ओठांच्या त्वचेचे सुद्धा नुकसान होऊ लागते. ओठांवर वाढलेला काळेपणा, पिगमेंटेशन, ओठांवरील त्वचा निघून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळ्या ब्रँडचे लिपबाम किंवा इतर क्रीम्स लावतात. मात्र केमिकलयुक्त हानिकारक घटकांचा वापर करून बनवलेले लिपबाम किंवा इतर कोणतेही क्रीम ओठांसाठी चांगले नाहीत. यामुळे ओठांचे आणखीनच नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात काळवंडलेले ओठ सुधारण्यासाठी सुधारण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे ओठ अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
चेहऱ्याचे सौंदर्य उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. मेकअप करताना ओठांवर वेगवेगळ्या ब्रँडची लिपस्टिक लावली जाते. मात्र यामुळे ओठांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. फाटलेले किंवा काळे झालेले ओठ हळूहळू अतिशय रुक्ष आणि कोरडे दिसू लागतात. त्यामुळे खराब झालेली ओठांची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे ओठ अतिशय सुंदर आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसू लागतात.
ओठांवरील त्वचा अतिशय मऊ आणि संवेदनशील असते. ओठांची काळजी घेताना कोणत्याही चुकीचा प्रॉडक्टचा वापर न करता ओठांना सूट होतील असेच प्रॉडक्ट वापरावे. ज्यामुळे तुमचे ओठ कोरडे किंवा रुक्ष दिसणार नाहीत. ओठांची काळजी घेताना ओठांना फक्त लिपबाम न लावतात ओठांची योग्य काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे उन्हाळयाच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिऊन ओठ हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. ओठांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ओठ अतिशय काळवंडून आणि कोरडे होऊन जातात. अशावेळी विटामिन सी युक्त पेयांचे किंवा नारळ पाण्याचे सेवन करावे.
उन्हाळ्यात डोळे देखील सांभाळा ! योग्य काळजी न घेतल्या वाढेल इन्फेक्शनचा धोका
ओठांची काळजी घेताना भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात नारळ पाणी, ताक किंवा इतर पेयांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय ओठांवर कोणत्याही चुकीच्या ब्रँडची लिपस्टिक न लावता त्वचेला सूट होईल अशीच लिपस्टिक लावावी. यामुळे तुमचे ओठ कोरडे किंवा फाटलेले दिसणारी नाहीत. ओठासंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर खोबऱ्याचे तेल किंवा तूप ओठांवर लावावे. तज्ज्ञांच्या मते, आरोग्याची किंवा त्वचेची ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते तशीच काळजी ओठांची सुद्धा घ्यावी.