पावसाळ्यात घर, कुलुपांची काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)
भारतातील उन्हाळा हा कडक उष्णतेसाठी ओळखला जातो. यामुळे लोक मान्सूनची, त्यामुळे येणाऱ्या थंडाव्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाचा पहिला थेंब पडताच, छत्र्या, रेनकोट आणि वॉटरप्रूफ गोष्टी कपाटातून बाहेर येतात. कारण पाऊस आवडत असला तरी प्रत्येकालाच बाहेर कोरडे राहण्याची इच्छा असते. या सर्व तयारी दरम्यान, एक महत्त्वाचा पैलू नेहमीच दुर्लक्षित केला जातो, तो म्हणजे आपल्या घरातील कुलूपांची काळजी. उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी पावसाळा गरजेचं असला तरी अनेकदा तो घरमालकांसाठी नवीन आव्हाने देखील आणतो, विशेषतः दरवाजांची कुलुपे.
पावसाळ्यात सामान्यतः आर्द्रता जास्त असते आणि अचानक येणारा पावसामुळे धातूच्या वस्तूंना गंज चढतो किंवा त्या जाम होतात. यामुळे सुरक्षा आणि सोय दोन्हीही धोक्यात येऊ शकते. पावसाची तीव्रता आणि अनिश्चितता लक्षात घेता, कुलुपाची योग्य देखभाल केवळ कार्यक्षमतेसाठीच नाही तर मनःशांतीसाठी देखील आवश्यक असते. श्याम मोटवानी, व्यवसाय प्रमुख – लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्युशन्स, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप यांनी आपल्या वाचकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पावसाळ्यातील संरक्षण
सुरक्षितता ही तुमच्या दारापासूनच सुरू होते आणि पावसाळ्यात जर संरक्षणाची ही पहिलीच फळी नीट नसेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कोणत्याही घराच्या सुरक्षिततेमध्ये कुलूप हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जेणेकरून घरात राहणाऱ्या लोकांची सुरक्षा निश्चित होईल. त्यांची देखभाल न केल्याने कुलूप तुटणे, ते काम न करणे असे धोके निर्माण होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार तुमचे घर कसे असावे? जाणून घ्या
कशी घ्यावी काळजी
भारतात पावसाळा अनेक महिने असतो म्हणून काही गोष्टींची काळजी काटेकोरपणे घ्यायलाच हवी, जसे की:
नवी लॉकिंग सिस्टिम
पावसाळा जवळ येत असताना, तुमचे घर केवळ कोरडे राहण्यासाठीच नव्हे तर सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही तयारी करणे गरजेचे आहे. पावसाळी तयारीतील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे तुमच्या घराची लॉकिंग सिस्टम. तीव्र हवामान परिस्थिती – मग ती उष्णता, आर्द्रता किंवा मुसळधार पाऊस असो – यात टिकून राहतील अशा कुलूपांमध्ये गुंतवणूक करणे हे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी एक स्मार्ट पाऊल आहे.
उच्च आर्द्रता सहन करण्यासाठी डिझाइन केलेल्या साहित्यापासून तयार करण्यात आलेले हवामान-प्रतिरोधक डिजिटल, यांत्रिक किंवा स्मार्ट कुलूप निवडा. हे कुलूप गंज चढू देत नाही तसेच ओलसर वातावरणातही आपले काम चोख बजावते. अनेक विश्वसनीय ब्रँड आता भारतीय हवामान परिस्थितीनुसार तयार करण्यात आलेले कुलूप देतात, ज्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात टिकाऊपणा तसेच विश्वासार्हता निश्चित होते.
नवीन घराचे बांधकाम करताना या गोष्टी ठेवा, कोणताही राहणार नाही दोष
नियमित काळजी महत्त्वाची
अर्थात असे असले तरीही नियमित देखभाल देखील तितकीच महत्त्वाची आहे. एक साधी नियमित तपासणी गंज, जॅमिंग आणि घराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या इतर समस्या टाळू शकते. त्यामुळेच या पावसाळ्यात एक काळजी घेत तुमचे कुलूप अपग्रेड करा, त्यांची चांगली देखभाल करा आणि तुमचे घर अधिक स्मार्ट तसेच सुरक्षित ठेवणारे कनेक्टेड सुरक्षा उपाय स्वीकारा – मग पाऊस असो की ऊन.