सकाळच्या नाश्त्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा मेथीच्या पुऱ्या
चवीला कडू असणारी मेथी भाजी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना खायला आवडत नाही. मेथीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण मेथीची भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाजीमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेथीच्या भाजीपासून चविष्ट आणि कुरकुरीत पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. मेथीच्या पुऱ्या आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतात. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना किंवा इतर वेळी खाण्यासाठी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मेथीच्या पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
होळीचा सण होईल आणखीनच खास! घरी बनवा चविष्ट केशर थंडाई, सण होईल आनंदात साजरा
साखर तुपाचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा फुटण्याची चिक्की, नोट करा सोपा पदार्थ