Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

ग्रीसमधील माउंट एथोस हे जगातील सर्वात अनोख्या आणि रहस्यमय धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हजार वर्षांहून अधिक जुनी परंपरा आजही येथे कायम असून महिलांना या परिसरात प्रवेश करण्यास बंदी आहे. विशेष परवानगीशिवाय कोणालाही येथे सहज प्रवेश मिळत नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 08:53 AM
युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

Follow Us
Follow Us:
  • हजार वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.
  • येथे २० ऐतिहासिक मठ आणि अनेक आश्रम आहेत.
  • माउंट एथोसला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.
तुम्हाला माहिती आहे का? उत्तर ग्रीसच्या दुर्गम भागात एक असे ठिकाण आहे जे आधुनिक जगापासून अजूनही फार लाबं आहे. आम्ही ज्या ठिकाणाविषयी बोलत आहोत त्याचे नाव आहे ‘माउंट एथोस’. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, एक हजार वर्षाहून अधिक काळ लोटला पण आजही इथे महिलांना जाण्यास बंदी आहे. मादी प्राण्यांनाही इथे जाऊ दिले जात नाही. चला या ठिकाणाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

फार कमी लोकांना मिळते एंट्री

भौगोलिकदृष्ट्या, माउंट एथोस ग्रीसच्या उत्तर भागातील हाल्किडिकी द्वीपकल्पाच्या पूर्वेकडील टोकावर वसले आहे. जरी याला ग्रीस गणराज्याचे भाग केले असले तरी एक विशेष स्वायत्ता त्याला प्राप्त आहे. ग्रीसचे संविधान स्वतः या अद्वितीय दर्जाचे संरक्षण करते. साधारण ३३५ चौरस किलोमीटर क्षेत्रात या द्विपकल्पात २० प्रमुख मठ, अनेक लहाम आश्रम आणि प्रार्थनास्थळे आहेत. संपूर्ण क्षेत्राचे प्रशासन ‘कारयेस’ नावाच्या ठिकाणाहून चालवला जातो. हे काही सामान्य पर्यटनस्थळ नाही तर इथे जाण्यासाठी विशेष परवानगी पत्राची गरज लागते ज्यामुळे दररोज फार कमी लोकांना या ठिकाणी एंट्री मिळते.

फार जुनी ‘अवाटॉन’ परंपरा

माउंट एथोसची सर्वात प्रमुख ओळख म्हणजे इथली ‘अवाटॉन’ परंपरा. या प्रथेनुसार महिलांना इथे एंट्री दिली जात नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, अलिकडे तयार करण्यात आलेला नियम नाहीये तर बायझंटाईन साम्राज्याच्या काळापासून या प्रथेचे पालन केले जात आहे. ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन श्रद्धेनुसार, असं मानलं जातं की, मदर मेरीने या द्विपकल्पाला भेट दिली होती आणि याला आपले आध्यात्मिक वन म्हणून घोषित केले होते. इथे राहणाऱ्या साधुंचा दृढविश्वास होता की, इथे महिलांची अनुपस्थिती ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्यास मोठी मदत करते आणि यामुळे जागेचे पावित्र्य जपले जाते.

ही बंदी इतकी व्यापक आहे की ती राष्ट्रीयत्व, धर्म किंवा सामाजिक दर्जाचा विचार न करता सर्व महिलांवर लागू होते. फक्त महिलाच नाही तर मांजरी आणि मादी प्राण्यांनाही या द्विपकल्पात जाण्यास मनाई असल्याचे सांगितले जाते.

आध्यात्मिक खजिना

पूर्व ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती धर्मात माउंट एथोसला फार महत्त्व होते. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे. इथे वसलेल्या अनेक मठांचा इतिहास हजार वर्षे जुना आहे. या मठांच्या भिंतींमध्ये एक अनमोल खजिना दडलेला आहे ज्यात धार्मिक कलाकृती, मूर्ती आणि प्राचीन दस्तऐवज यांचा समावेश होतो. या इमारतींची स्थापत्य रचना शतकानुशतके जवळजवळ तशीच राहिली आहे. त्यांचे महत्व ओळखून युनेस्कोने जागतिक वारशा स्थळांच्या यादीत या ठिकाणाचा समावेश केलेला आहे.

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

शहरांपासून दूर इथले जीवन फार वेगळे आहे. इथे राहणाऱ्या भिक्षुंचा संपूर्ण दिवस प्रार्थना, शारीरिक श्रम आणि धार्मिक अध्यायानात निघून जातो. पहाटेआधीच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. या ठिकाणाला भेट देणाऱ्या काही पर्यटकांचे म्हणणे आहे की, एजियन समुद्राच्या काठावर वसलेल्या या मठांमध्ये वेळ जणू थांबून जातो. आधुनिक तंत्रज्ञान आणि बाहेरिक जगाचा प्रभाव इथे फार कमी आहे.

 

Web Title: Mount athos greece women entry ban 1000 year old tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Greece
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई
1

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या
2

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
3

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या
4

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.