Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC Hospital Assault : कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’, डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. 'दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घालणार नाही,' असे स्पष्ट करत त्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 03:24 PM
कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; 'दोषींवर कठोर कारवाई होणार', डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा

कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण; 'दोषींवर कठोर कारवाई होणार', डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • कल्याणातील डॉक्टर मारहाण प्रकरण
  • ‘दोषींवर कठोर कारवाई होणार’
  • डॉ. श्रीकांत शिंदे यांचा इशारा
Shrikant Shinde On KDMC Hospital Assault : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट भूमिका घेत, दोषी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे.

‘डॉक्टर म्हणून मला माहिती आहे…’

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांनी म्हटले की, “कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की, रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे.”

Shrikant Shinde : ‘ऑपरेशन टायगर’चे मास्टरमाइंड डॉ. श्रीकांत शिंदे? उबाठाला खिंडार पाडण्यात रणनीती ठरली निर्णायक

ते पुढे म्हणाले की, डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर,… — Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) July 8, 2026

दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईसोबतच पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.”

‘डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा’

एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर या दोन्ही भूमिकांमधून आपण डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले. “KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

नेमके काय घडले?

सोमवारी एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी नवजात बाळाला उपचारासाठी एनआयसीयू (नवजात शिशु अतिदक्षता विभाग)ची गरज भासू शकते, अशी माहिती नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णालयातील एनआयसीयू विभागातील सर्व बेड भरलेले असल्याने जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बाळाच्या सुरक्षिततेचा विचार करून डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांनी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.

फोनला प्रतिसाद न मिळाल्याने वाद वाढला

रुग्णाच्या नातेवाईकांनी याच रुग्णालयात जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र जागा नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी शास्त्रीनगर परिसरातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला. नगरसेवकांनी डॉक्टरांना फोन केला, मात्र ते रुग्णसेवेत व्यस्त असल्यामुळे फोन उचलू शकले नाहीत. त्यानंतर रात्री नगरसेवक आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांना जाब विचारला.

kalyan News: कल्याणच्या वालधुनीत उभारणार भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल; सांस्कृतिक-धार्मिक विकासाला चालना

डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण

आरोपानुसार, कोणतीही सविस्तर विचारपूस न करता डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डॉक्टर संघटना आणि विविध वैद्यकीय संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Kdmc doctors assault case shrikant shinde warning strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Hospital
  • kalyan news
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
1

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ
2

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब
3

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल
4

गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.