Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel Tips : अनेकजण उत्तराखंडातील बद्रिनाथ धामला भेट देतात. पण इथे सप्त बद्रिंची यात्राही आहे याची माहिती फार कमी लोकांना आहे. डोंगराळ भागातून प्रवास करत तुम्ही उत्तरखंडातील सप्त बद्रिंनाही भेट देऊ शकता. हे ७ धाम वाटेतच असल्याने कमी वेळात प्रवास पूर्ण होतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 08:10 AM
Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडातील एका विशेष धार्मिक यात्रेबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.
  • या प्रवासात अनेक प्राचीन मंदिरांसोबत हिमालयातील निसर्गाचाही अनुभव घेता येतो.
  • मुंबईहून जाणाऱ्यांसाठी मार्ग, मुक्काम आणि प्रवासाची योग्य तयारी महत्त्वाची ठरते.
तुम्हीही उत्तराखंडातील बद्रिनाथ धाम पाहून परत येण्याचा विचार केला असेल तर ती तुमची मोठी चूक ठरु शकते. फार कमी लोकांना हे माहिती आहे की, भगवान विष्णूंच्या देवभूमित म्हणजेच उत्तराखंडात सप्त बद्री देखील आहेत ज्यांचे दर्शन करणे महत्त्वाचे मानले जाते. सप्त बद्रिंची ही यात्रा फक्त एक धार्मिक पर्यटन नसून हिमालयातील खोरी, शांत गावे आणि सुंदर जंगलं पाहण्याची संधी आहे. मुंबईहून सप्त बद्रिंची यात्रा करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम हरिद्वार, ऋषिकेश किंवा डेहराडून सारख्या प्रमुख शहरांना भेट द्यावी लागेल. इथून डोंगराळ भागांचा प्रवास करुन तुम्ही सप्त बद्रिंना भेट देऊ शकता.

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

मुंबईहून अशी सुरु करा सप्त बद्रि यात्रा

मुंबईहून सप्त बद्रि यात्रा करण्यासाठी सुरुवातील तुम्हाला महाराष्ट्रातून उत्तराखंडमधील हरिद्वार किंवा ऋषिकेश येथे पोहोचावे लागेल. इथून तुम्ही पुढे ७ मंदिरांना भेट द्याल. इथे देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग आणि जोशीमठमार्गे बद्रिनाथाचा प्रवास सुरु होईल. येथील बहुतांश रस्ते चांगले आहेत, तथापि पावसाळ्यात इथे जाण्याआधी परिस्थितीचा आढावा नक्की घ्या.

अशाप्रकारे पूर्ण होईल प्रवास

इथे तुम्ही सर्वात आधी बद्रिनाथ मंदिराचे दर्शन घ्याल. इथून परतत असताना पूर्वेला २० किलोमीटर अंतरावर पांडुकेश्वरमध्ये योगध्यान बद्रीला भेट द्या. यानंतर पुढे जाताना नीति घाटीजवळील तपोवन येथे पोहचा आणि ४-५ किलोमीटर पायी प्रवास करुन भविष्य बद्रिचे दर्शन घ्या. इथून पुन्हा जोशीमठला या आणि कर्णप्रयाग रोडवर अणीमठ येथे वृद्ध बद्रिचे दर्शन घ्या. यानंतर हेलंगहून उर्गम खोऱ्याकडे प्रवास करा. इथे एकाच वेळी ध्यान बद्री आणि पंच केदारांपैकी एक असलेल्या कल्पेश्वर महादेवाचे एकत्रित दर्शन घेता येते. शेवटी, कर्णप्रयागहून आदि बद्री येथे पोहोचून सप्त बद्री यात्रा पूर्ण होते.

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

यात्रेदरम्यान कुठे राहायचे?

रात्रीच्या वेळी मुक्कामासाठी जोशीमठ एक सर्वात उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला बजेट फ्रेंडली हाॅटेल्, धर्मशाळा आणि होमस्टे आरामात उपलब्ध होतील. उर्गम घाटाजवळ देखील होमस्टेची सुविधा मिळते. यात तुमच्या भोजनाचीही सुविधा पुरवली जाते. तुम्ही सकाळी लवकर आपली यात्रा सुरु करु शकता. यात्रेवेळी गरम कपडे, रेनकोट, औषध आणि पैसे घेऊन प्रवासाला सुरुवात करा. लक्षात घ्या, डोंगराळ भागातून प्रवास करताना अनेकदा तुमच्या मोबाईलला नेटवर्क मिळणार नाही त्यामुळे महत्त्वपूर्ण वस्तू आणि माहितीसह यात्रेला सुरुवात करा.

 

Web Title: Mumbai to sapt badri yatra complete travel guide route temples itinerary stay budget tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • Religious Places
  • travel news
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
1

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
2

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट
3

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…
4

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.