Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

Bali Trip Budget : बाली हे इंडोनेशियातील एक नयनरम्य बेट आहे. इथे समुद्रकिनारा, मंदिर, वाॅटर स्पोर्ट्स, ट्रेकिंग अशा अनेक गोष्टींचा आनंद लुटता येतो. जोडीदारासोबत या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर आजच खर्चाविषयीचे सर्व तपशील जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 08:05 AM
Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • परदेशात कमी बजेटमध्ये फिरण्याचा विचार करत असाल, तर हा पर्याय नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे.
  • प्रवासापूर्वी फ्लाईट, व्हिसा आणि राहण्याचा खर्च समजून घेतल्यास ट्रिप अधिक सोपी होते.
  • योग्य नियोजन केल्यास सुंदर पर्यटनस्थळांचा आनंद बजेटमध्येही घेता येऊ शकतो.
इंडोनेशियातील सर्वात लोकप्रिय टूरिस्ट स्पाॅट, बाली हे जगातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय टूरिस्ट डेस्टीनेशनपैकी एक आहे. दरवर्षी भारतातून अनेक पर्यटक बाली फिरायला जातात. अशात तुम्हीही जर तुमच्या जोडीदारासोबत इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करायचा विचार करत असाल तर बाली तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल. आज आपण या लेखात दोन लोकांना बाली फिरण्यासाठी साधारण किती खर्च लागू शकतो याविषयीची काही माहिती जाणून घेणार आहोत.

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

तुमची बाली ट्रीप जर ६०,००० रुपयांत पूर्ण होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु सर्व गोष्टींचा खर्च एकत्र करुन कमीत कमी १ लाख रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. आम्ही इथे फक्त एका व्यक्तीच्या खर्चाविषयी नाही तर दोन व्यक्तींच्या ट्रिपच्या खर्चाविषयी चर्चा करत आहोत. बाली फिरण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथे भारतीय रुपयाला जास्त किंमत आहे. हेच कारण आहे की, बालीत तुम्ही सामान्य बजेटमध्ये अनेक गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. चला इथे कसं जायचं, हाटेल बुकिंग आणि त्याच्या किमतीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

फ्लाईट बुकिंग

बालीची सहल कमी बजेटमध्ये कशी करावी हे तुमच्या हातात आहे. फ्लाईट बुकिंग करायची असल्यास कमीत कमी दोन महिन्यांआधीचे तिकिट बुक करा. साधारणपणे, दोन लोकांसाठी येण्या-जाण्याच्या तिकिटाची किंमत सुमारे ४५,००० रुपये असते. हे बजेट ७०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. तुम्ही काही महिन्यांआधी जर तिकिट बुक केले तर तुम्हाला सेल किंवा अन्य दुसरे बेनेफिट्स मिळतात.

व्हिसा ऑन अराइव्हल

भारतीय पर्यटक बालीत फिरणं अधिक पसंत करतात, कारण इथे भारतीयांना व्हिसा ऑन अराव्हलची सुविधा दिली जाते. भारतीय या सुविधेचा फायदा घेऊन ३० दिवस इंडोनेशात राहू शकतात. इंडोनेशियात भारतीय १ रुपयाची किंमत १८८ आईडीआर इतकी आहे. व्हिसासाठी इथे ५०,००० इंडोनेशियन रुपये द्यावे लागतात. या हिशोबाने भारतीय रुपयांत दोन व्यक्तींचा व्हिसा ५,२०० ते ५,६०० रुपयांत काढता येईल.

हाॅटेलचा खर्च

फ्लाईट खर्च जास्त होत असला तरी तुम्ही बाली ट्रिप आपल्या बजेटमध्ये पूर्ण करु शकता. ब्लाॅगर्स किंवा अनेक टुरिस्ट इथे हाॅस्टेलमध्ये राहतात ज्यासाठी प्रत्येक दिवस ५०० रुपयांचा खर्च येतो. बालीत कुटा, लेगियान किंवा उबुदसारख्या भागांमध्ये, ३-स्टार हॉटेलचा खर्च २,५०० ते ४,००० रुपयांच्या दरम्यान असतो. ४,००० रुपयांसाठी, तुम्हाला सहा दिवसांकरिता २४,००० रुपये मोजावे लागू शकतात.

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

ट्रान्सपोर्टचा खर्च

बालीत तुम्ही समुद्रकिनाऱ्यासोबत इतर एक्टिव्हिटीजचाही आनंद लुटु शकता. इथे भाड्याने स्कूटी घेऊन अनेक टुरिस्ट स्पाॅट्सना भेट देता येते. यासाठी ३५० ते ७५० रुपयांपर्यंतचा खर्च येईल. पर्सनल कॅब करायची असेल तर त्यासाठी ३००० ते ४००० रुपयांपर्यंतचा खर्च येईल. फिरण्यासाठी इथे अनेक मंदिर, वॉटर स्पोर्ट्स, बाली स्विंग आणि माउंट बटूर सनराईज ट्रेक सारख्या गोष्टी उपलब्ध आहेत.

Web Title: Bali trip cost for couple from india budget travel guide flight visa hotel expenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • Indonesia
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
1

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट
2

Travel News : जगातील सर्वात अनोखा एअरपोर्ट, इथे समुद्रकिनाऱ्यावर लँड करते फ्लाईट

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…
3

Travel News : मध्य प्रदेशचा तो ऐतिहासिक किल्ला, इथल्या राजाने जादूने राणीला केलं होतं कैद…

लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल…
4

लग्नासाठी रेल्वेचे संपूर्ण कोच बुक करायचे आहे? अशाप्रकारे करा बुकिंग; जाणून घ्या किती खर्च येईल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.