(फोटो सौजन्य: istock)
रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
तुमची बाली ट्रीप जर ६०,००० रुपयांत पूर्ण होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु सर्व गोष्टींचा खर्च एकत्र करुन कमीत कमी १ लाख रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. आम्ही इथे फक्त एका व्यक्तीच्या खर्चाविषयी नाही तर दोन व्यक्तींच्या ट्रिपच्या खर्चाविषयी चर्चा करत आहोत. बाली फिरण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथे भारतीय रुपयाला जास्त किंमत आहे. हेच कारण आहे की, बालीत तुम्ही सामान्य बजेटमध्ये अनेक गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. चला इथे कसं जायचं, हाटेल बुकिंग आणि त्याच्या किमतीविषयी सविस्तर जाणून घेऊया.
फ्लाईट बुकिंग
बालीची सहल कमी बजेटमध्ये कशी करावी हे तुमच्या हातात आहे. फ्लाईट बुकिंग करायची असल्यास कमीत कमी दोन महिन्यांआधीचे तिकिट बुक करा. साधारणपणे, दोन लोकांसाठी येण्या-जाण्याच्या तिकिटाची किंमत सुमारे ४५,००० रुपये असते. हे बजेट ७०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. तुम्ही काही महिन्यांआधी जर तिकिट बुक केले तर तुम्हाला सेल किंवा अन्य दुसरे बेनेफिट्स मिळतात.
व्हिसा ऑन अराइव्हल
भारतीय पर्यटक बालीत फिरणं अधिक पसंत करतात, कारण इथे भारतीयांना व्हिसा ऑन अराव्हलची सुविधा दिली जाते. भारतीय या सुविधेचा फायदा घेऊन ३० दिवस इंडोनेशात राहू शकतात. इंडोनेशियात भारतीय १ रुपयाची किंमत १८८ आईडीआर इतकी आहे. व्हिसासाठी इथे ५०,००० इंडोनेशियन रुपये द्यावे लागतात. या हिशोबाने भारतीय रुपयांत दोन व्यक्तींचा व्हिसा ५,२०० ते ५,६०० रुपयांत काढता येईल.
हाॅटेलचा खर्च
फ्लाईट खर्च जास्त होत असला तरी तुम्ही बाली ट्रिप आपल्या बजेटमध्ये पूर्ण करु शकता. ब्लाॅगर्स किंवा अनेक टुरिस्ट इथे हाॅस्टेलमध्ये राहतात ज्यासाठी प्रत्येक दिवस ५०० रुपयांचा खर्च येतो. बालीत कुटा, लेगियान किंवा उबुदसारख्या भागांमध्ये, ३-स्टार हॉटेलचा खर्च २,५०० ते ४,००० रुपयांच्या दरम्यान असतो. ४,००० रुपयांसाठी, तुम्हाला सहा दिवसांकरिता २४,००० रुपये मोजावे लागू शकतात.
Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
ट्रान्सपोर्टचा खर्च
बालीत तुम्ही समुद्रकिनाऱ्यासोबत इतर एक्टिव्हिटीजचाही आनंद लुटु शकता. इथे भाड्याने स्कूटी घेऊन अनेक टुरिस्ट स्पाॅट्सना भेट देता येते. यासाठी ३५० ते ७५० रुपयांपर्यंतचा खर्च येईल. पर्सनल कॅब करायची असेल तर त्यासाठी ३००० ते ४००० रुपयांपर्यंतचा खर्च येईल. फिरण्यासाठी इथे अनेक मंदिर, वॉटर स्पोर्ट्स, बाली स्विंग आणि माउंट बटूर सनराईज ट्रेक सारख्या गोष्टी उपलब्ध आहेत.






