Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

विविध नामांकित संशोधन संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी डीएनए/आरएनए निष्कर्षण व गुणवत्तेचे परीक्षण, पीसीआर व आरटी-पीसीआर तत्त्वे, प्रायमर व प्रोब डिझाइन, क्वांटिटेटिव्ह पीसीआर डेटा विश्लेषण, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 08:50 AM
मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक आरटी-पीसीआर प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक आरटी-पीसीआर प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

Follow Us
Follow Us:

मुंबई: विद्यार्थ्यांना आधुनिक आण्विक जीवशास्त्रातील प्रगत ज्ञान आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा कौशल्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने रिअल-टाइम पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) विषयावरील दोन आठवड्यांचा ऑन-द-जॉब ट्रेनिंग या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.(फोटो सौजन्य – istock)

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

विद्याथ्यांना सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच संशोधन संस्था, आरोग्यसेवा आणि जैवतंत्रज्ञान उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील अपेक्षांनुसार आवश्यक व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. या उपक्रमांतर्गत विविध नामांकित संशोधन संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी डीएनए/आरएनए निष्कर्षण व गुणवत्तेचे परीक्षण, पीसीआर व आरटी-पीसीआर तत्त्वे, प्रायमर व प्रोब डिझाइन, क्वांटिटेटिव्ह पीसीआर डेटा विश्लेषण, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील

उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच आरटी-पीसीआर सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान क्षेत्रातील बदलत्या गरजाशी सुसंगत बनवत असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे केंद्राचे ध्येय असल्याचे राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. पूजा सेवक, प्रमुख संशोधक (क्रिटिकल मेटल बायोमायनिंग प्रोजेक्ट) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्तम नियोजन, अंमलबजावणी आणि तांत्रिक समन्वय करण्यात आले.

व्यापक प्रयोगशाळा प्रशिक्षण हे प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य

या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यापक प्रयोगशाळा प्रशिक्षण हे होते. विद्यार्थ्यांनी माध्यम तयार करणे, सूक्ष्मजीव संवर्धन, डीएनए/आरएनए निष्कर्षण, न्यूक्लिक अॅसिडचे परिमाण मोजणे, स्वयंचलित डीएनए निष्कर्षण प्रणाली, पारंपरिक पीसीआर, आरटी-पीसीआर, फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी, प्रतिमा विश्लेषण सॉफ्टवेअर आणि आरटी-पीसीआर डेटाचे विश्लेषण यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याशिवाय प्रयोगांचे नियोजन, दूषितीकरण नियंत्रण, गुणवत्ता हमी आणि प्रयोगशाळेतील मानक कार्यपद्धती यांचेही प्रशिक्षण देण्यात आले.

सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी

सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितला प्रशिक्षणाचा अनुभव

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही प्रशिक्षणाचा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा असल्याचे सांगितले. वझे-केळकर महाविद्यालयातील एम. एस्सी. प्राणिशास्त्र शाखेची विद्यार्थिनी थंगाज्योती, मुंबई विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील घाना येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी लॅम्पसन डकारे, जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थिनी मरियम खान आणि एसआरएम विद्यापीठ चेन्नई येथील अदिती पटेल, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नवी मुंबई येथील अनुष्का जोंधळे आणि दिपाली सातपुते तसेच एचएसएनसी विद्यापीठ मुंबई येथील रौनक त्रिपाठी यांनी सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष प्रयोगांचा अनुभव, आधुनिक उपकरणांचा वापर आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे संशोधन क्षेत्रातील आत्मविश्वास आणि कौशल्ये अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त केली.

Web Title: Mumbai university conducts advanced rt pcr training program equipping students with modern laboratory skills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Updates
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
1

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
2

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
4

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.