सुखी जीवनाचे रहस्य! 'या' सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी
उतारवयात माणसाला सुख हवे असते. जीवनातील आनंद आणि सुख हे कायमच नेहमी आपल्या सोबतच असते. केवळ गरज असते आपण त्याकडे त्या दृष्टीने पाहण्याची. अर्थात यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करावे लागत नाही. फक्त जे तुमच्याकडे आहे त्याची तुम्हाला जाणीवर करून घ्यावी लागते. आता ही जाणीव कशी होईल. तर त्यासाठी या गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळाव्या आणि समजून घ्याव्या लागतील.(फोटो सौजन्य – istock)
आपले जीवन हे अनेक घटना, घडामोडींनी बनलेला एक समुद्र आहे. ज्यात अनुभव, अनुभूती यांचे प्रत्यंतर क्षणाक्षणाला येते. अशावेळी प्रत्येक प्रसंगातून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही जे नवे शिकता त्याचा प्रसंगानुरूप तुमच्या आयुष्यात वापर करण्याचाही प्रयत्न करा. नवीन गोष्टी शिकणे ही देखिल एक प्रक्रिया आहे. जी जीवनाला आनंद देऊन जाते.
नेहमी लोकांच्या संपर्कात राहा. संवाद साधा. असे केल्याने लोकांची सुख-दुःखे आपणास समजतात. आपल्या अडचणी समोरच्याला लक्षात येतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या सुख-दुःखात आपल्याला सहभागी होता येते. तसेच, आपल्या अडचणी सोडविण्यासाठी समोरच्याची मदतही होते.
आपल्यापैकी अनेक व्यक्ती नेहमी स्वत: ला दोष देत असतात. पहिल्यांदा तसे करणे बंद करा. याचा अर्थ इतरांना दोष द्या असा नव्हे. आयुष्यात संघर्ष हा अटळ आहे. तशाच चुका आणि अपघातही अटळ आहेत. आवश्यकता असते ती या सर्वांतून मार्ग काढण्याची. त्यासाठी स्वतः ला पुरेपूर ओळखण्याचा प्रयत्न करा. जेनेकरून तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला कळेल. एकदा का तुम्हाला तुमची ओळख पटली तर, तुमच्या ध्येयापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. अगदी अपयश सुद्धा.
Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण
जीवनात घडणाऱ्या अप्रिय घटना, अपयश, संघर्ष आदी गोष्टींमुळे अनेकदा मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता असते. नकारात्मक विचार आपल्या आयुष्यातील आनंद हिरावून घेतो. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार हा नेहमीच आनंददायी असतो. लक्षात ठेवा जगातील कोणतीच घटना नकारात्मक नसते. त्यातून काहीतर सकारात्मक संदेश हा मिळतच असतो. फक्त तो शोधण्याची दृष्टी आपण निर्माण करावी लागते.






