
मुंबईच्या चिंचपोकळीचा चिंतामणी! गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली, जाणून घ्या इतिहास
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा इतिहास?
गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली?
चिंतामणीची स्थापना कोणत्या साली झाली?
History Of Chichpokalicha Chintamani: लालबाग – परळ भाग म्हणजे गणेशोत्सवात धमाल करण्यासाठी पर्वणी. आपण लालबागचा राजा, गणेशगल्ली या दोन्ही बाप्पांचा इतिहास आणि स्थापना कधी झाली जाणून घेतलं. याच्याच जवळ अशणारा चिंचपोकळीचा चिंतामणी हा बाप्पादेखील तितकाच प्रसिद्ध आहे. आता या गणपतीला अदानीसारख्या मोठ्या उद्योजकांनी प्रायोजकत्व बहाल केलं आहे. पण या बाप्पाची स्थापना नेमकी कधी झाली आणि काय आहे या गणपती मंडळाचा इतिहास जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन टिळकांना आदरांजली वाहण्यासाठी ६ सप्टेंबर, १९२० मध्ये दत्ताराम पुजारी, महादेव बसनाक, दत्ताराम मयेकर, कॅप्टन पाटणकर इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. यानंतर १० दिवसात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून त्याकाळातील धडाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरात सुरूवात केली.
केवळ ४ आणे वर्गणीवर हा उत्सव मंडळाने सुरू केला आणि पहिल्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा झाली ती, म्हणजे डेक्कन कॉर्प्सच्या जागेत. लक्ष्मीनारायण व्यायामशाळा ते काळाचौकी रोड आणि शिवडी ते भारतभाता टॉकीज असे सुरूवातीला या बाप्पाच्या कार्यकर्त्यांचे क्षेत्र होते. तब्बल १९ वर्षांनी हा बाप्पा चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूला रेल्वेहद्दीच्या भिंतीलगत स्थायिक झाला आणि त्यानंतर आजतागायत हा बाप्पा इथेच आहे.
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
१९५६ साली या मंडळाची घटना तयार झाली आणि त्यानंतर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे नाव देण्यात आले हे कार्य केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर सर्वांना मदत व्हावी या उद्देशानेच ही घटना करण्यात आली. आजही या बाप्पाच्या दर्शनाला लाखो भाविक येतात आणि लालबाग – परळच्या मिल कामगारांच्या या गणपतीचा महिमा तसाच आहे. उंच इमारती झाल्या पण बाप्पाच्या कार्यात कधीच कुठे कमतरता आली नाही हेच वैशिष्ट्य.