Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत ‘देवाचे डोळे’… साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांचीही शूटिंग झालीये इथे

Eyes Of God : बल्गेरीयामध्ये एक अनोखी गुफा वसली आहे जिला देवांचे डोळे म्हणून ओळखले जाते. गुफेत खडकांची अनोखी रचना पाहायला मिळते. साहसप्रेमींसाठी हे ठिकाणा खास मानले जाते. विशेष म्हणजे गुफेत जाण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 02:25 PM
जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत 'देवाळे डोळे'... साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांची शूटिंगही झालीये इथे

जगातील सर्वात रहस्यमयी गुफा जिथे आहेत 'देवाळे डोळे'... साहस प्रेमींसाठी खास; अनेक चित्रपटांची शूटिंगही झालीये इथे

Follow Us
Follow Us:
  • गुफेच्या छतावरील दोन विशाल नैसर्गिक छिद्रे तिला एक रहस्यमय ओळख देतात.
  • सूर्यप्रकाश आणि पावसामुळे गुफेतील दृश्य आणखी अद्भुत आणि आकर्षक दिसते.
  • हे ठिकाण पर्यटकांसोबतच साहसप्रेमींसाठीही खास आकर्षण ठरत आहे.
जगात अनेक अनोखी आणि रहस्यमयी ठिकाणे आहेत ज्यांना पाहताच असे वाटते की, हा निसर्गाचा अद्भूत चमत्कार आहे. काही ठिकांणांचे दृष्य इतके सुंदर आणि अजब असते की पाहताच आपले डोळे विस्फारुन जातात. अशीच एक रहस्यमयी गुफा युरोपच्या बल्गेरिया (Bulgaria) येथे वसली आहे. या गुफेची खासियत याला ‘देवाचे डोळे’ (Eyes of God) असे म्हटले जाते. आता असं का म्हटलं जातं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, या ठिकाणी छतावर दोन मोठी छिद्रे आहेत जी मानवी डोळ्यांसारखी दिसतात. यामुळेच ठिकाणाला देवाचे डोळे असे नाव देण्यात आले आहे.

Travel News : ताजमहाल बघायला जाताय? तर मग आग्रातील या छुप्या ठिकाणांनाही एकप्लोर करा

या छिद्रातून सूर्याचा प्रकाश जेव्हा गुफेच्या आत जाते तेव्हा ते पाहायला आणखीनच छान वाटते. त्याचबरोबर जेव्हा जोरदार पाऊस सुरु होतो तेव्हा पाणी गुफेच्या आत जाते. यावेळी असं वाटतं जणू देव रडत आहे आणि देवाचे अश्रू धर्तीवर पडत आहेत. गुफेचे साैंदर्य इतके अनोखे आणि अद्भूत आहे की जगभरातून पर्यटक ही गुफा पाहण्यासाठी येतात.

कुठे आहे गुफा?

खरंतर ही गुफा बल्गेरियाची राजधानी सोफियापासून काही तासांच्या अंतरावर आहे. या गुफेला बल्गेरियातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. या गुफेत तुम्हाला खडकांच्या अद्भूत रचना पाहायला मिळतील. गुफेला देवाचे डोळे म्हणत असले तरी याचे मूळ नाव प्रोहोदना गुफा (Prohodna Cave) असे आहे. याची अनोखी नैसर्गिक बनावट या ठिकाणाच्या साैंदर्यांत आणखी भर घालते.

गुफेच्या आत डोळे कसे तयार झाले?

सांगितले जाते की, हे दोन छिद्र ज्यांना गुफेचे डोळे म्हटले जाते हे आधीपासून इथे नव्हते. हजारो वर्षांपर्यंत हवा, पाणी आणि नैसर्गिक क्षरण यांमुळे गुफेच्या छतावर दोन गोल छिद्रे तयार झाली. ही छिद्रे सुरुवातीला लहान होती पण वेळेसोबत ती मोठी होऊ लागली आणि त्यांना विशाल आकार मिळाला. आता ही छिद्रे अगदी डोळ्यांसारखी दिसू लागतात. निसर्गामुळे गुहेत तयार झालेल्या या छिद्रांमुळेच गुहेला एक वेगळेपण मिळाले आहे जे पर्यटकांना नेहमी आकर्षित करते. दिवसा जेव्हा सूर्याची प्रखर किरणे या गुफेवर पडतात आणि यातून प्रकाश बाहेर पडतो तेव्हा गुफा भारीच चमकू लागते.

साहसप्रेमींसाठी खास आहे ठिकाण

ही गुफा फक्त पर्यटकांसाठी नाही तर साहसप्रेमींसाठीही खास मानली जाते. गुफेचे प्रवेशद्वार साधारण १४८ फूट लांब आहे ज्यामुळे इथून बंजी जंपिग आणि राॅक क्लाइम्बिंग करता येते. अनेक लोक फक्त या रोमांचक अनुभवासाठी इथे येतात. उंचावरुन जेव्हा इथे उडी मारली जाते तेव्हा गुफेचे साैंदर्य पाहण्याचा अनुभव फार वेगळा असतो.

रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?

गुफेत झालीये अनेक चित्रपटांची शूटिंग

गुफेचे साैंदर्य इतके सुंदर आणि अद्भूत आहे की, अनेक चित्रपटांची शूटिंग देखील या ठिकाणी पार पडली आहे. १९८८ मध्ये बल्गेरियन चित्रपट ‘टाईम ऑफ व्हायलंस’ (Time of Violence) या चित्रपटाचे काही सीन्स या गुफेत शूट करण्यात आले आहेत. ही गुफा दिवसातील २४ तास खुली असते, इथे जाण्यासाठी कोणतेही बंधन नाही आणि यासाठी कोणते पैसेही आकारले जात नाही. तुम्ही कधी बल्गेरियाला गेलात तर या गुफेला भेट द्यायल विसरु नका.

 

Web Title: Mysterious eyes of god cave in bulgaria prohodna cave travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • caves
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

मुंबईतील सरकारी रुग्णालयांत रक्तटंचाई; थॅलेसेमिया, कर्करोग रुग्णांपुढे मोठे संकट
1

मुंबईतील सरकारी रुग्णालयांत रक्तटंचाई; थॅलेसेमिया, कर्करोग रुग्णांपुढे मोठे संकट

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय
2

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय

250 वर्षांपासून या जल महालाचे चार मजले आहेत पाण्यात, अनोखा आहे इथला इतिहास
3

250 वर्षांपासून या जल महालाचे चार मजले आहेत पाण्यात, अनोखा आहे इथला इतिहास

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट
4

Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.