
नैसर्गिक जंगल भेदू शकते कार्बन कवच! 'श्मिट सायन्सेस', इंडियाज क्लायमेट अँड एनर्जी फ्रंटियर्सचा अहवाल
मुंबई: समुद्रवसने देवि पर्वत स्तनमंडले, विष्णूपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे।’ सकाळी उठताना जमिनीवर पाय ठेवण्याआधी या मंत्राने नमस्कार करणाऱ्या आपल्या पृथ्वीला कार्बनने जखडले आहे. वाढत्या हवामान बदलाच्या संकटात पृथ्वीला जखडलेल्या या कार्बन सुटकेवर आशेचा किरण ठरू शकणारी महत्त्वाची बाब समोर आली आहे. जंगले आणि शेती मिळून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची क्षमता बाळगतात आणि योग्य नियोजन केल्यास ही क्षमता अनेक पटींनी वाढवता येऊ शकते, असे श्मिट सायन्सेस या संस्थेच्या पुढाकारातून तयार केलेल्या इंडियाज क्लायमेट अँड एनर्जी फ्रंटियर्स अहवालातून स्पष्ट झाले आहे. आज २२ एप्रिल या वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निष्कर्ष महत्त्वाचा ठरतो. अहवालानुसार, भारतातील वनक्षेत्र आणि शेती क्षेत्र मिळून दरवर्षी सुमारे अर्धा अब्ज टन सीओर शोषू शकतात. मात्र, सध्या या समतेचा पूर्ण उपयोग होत विशेषतः जैव-भूरसायनशास्त्र (बायो जीओकेमेस्ट्री) आणि कार्बन सायकलवरील संशोधन वाढवून, तसेच देशभर समन्वित पद्धतीने डेटा संकलन आणि निरीक्षण केल्यास ही क्षमता तब्बल ४०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.(फोटो सौजन्य – istock)
मिश्र पद्धतीचे म्हणजेच नैसर्गिक जंगल पृथ्वी सभोवती निर्माण होणारे कार्बन कवच भेदू शकते, मिश्र जंगलातच कार्बन शोषण्याची क्षमता आहे. शेती देखील अपर्यावरणीय म्हणजे मानवाने गरज म्हणून निर्माण केली आहे. नैसर्गिक जंगलाची लागवड करावी लागत नाही. त्याला फक्त वाव दिला तरी ते आपोआप उगवत अशा नैसर्गिक जंगलातच कार्बन शोषण्याची क्षमता असते. तेच पृथ्वीला वाचवू शकते, असे मत विद्याचर वालावलकर, पर्यावरण दक्षता मंच, यांनी व्यक्त केले आहे.
वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निष्कर्ष अधिक महत्त्वाचा ठरतो, पर्यावरण संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, जमिनीचा वापर, मातीची गुणवत्ता, जलसंधारण आणि शाश्वत शेती पद्धती यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे. यासाठी शास्त्रज्ञ, सरकार, उद्योग आणि स्थानिक समुदाय यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. योग्य धोरणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारत आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करून हवामान बदलाच्या संकटाशी लढा देऊ शकतो, असा विश्वास या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.