Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Pollution Deaths : प्रदूषित हवा बनतेय आरोग्याची शत्रू; वृद्ध आणि बालकांवर सर्वाधिक परिणाम, धक्कादायक अहवाल समोर

Air Pollution Deaths :   वायुप्रदूषण हे केवळ पर्यावरणीय समस्या नसून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका बनले आहे. याचा सर्वाधिक फटका वृद्ध आणि नवजात बालकांवर परिणाम होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 05:15 PM
Air Pollution Death

Air Pollution Death

Follow Us
Follow Us:
  • वायुप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक
  • पीएम २.५ आणि घरगुती प्रदूषणामुळे लाखो मृत्यू
  • बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगट धोक्यात
Air Pollution Deaths : सुनयना सोनवणे :  वायुप्रदूषण हे केवळ पर्यावरणीय समस्या नसून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका बनले आहे. ‘स्टेट ऑफ ग्लोबल रिपोर्ट २०२५’ च्या वार्षिक अहवालातून ओझोन, पीएम २.५ (सूक्ष्म धूलिकण) आणि घरगुती वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या वयोगटनिहाय आकडेवारीतून ही बाब ठळकपणे समोर आली आहे. विशेषतः ६० वर्षांनंतर प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अधिक गंभीर होत असून ७० ते ८५ वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
World Environment Day : वसुंधरेचे रक्षण हीच काळाची गरज! ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि यंदाची खास संकल्पना

वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाणा सर्वाधिक

अहवालानुसार, ७५ ते ७९ वर्षे वयोगटात प्रदूषणामुळे सर्वाधिक ३ लाख २२ हजार ४०० मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल ८० ते ८४ वर्षे वयोगटात ३ लाख ९ हजार ८००, तर ८५ ते ८९ वर्षे वयोगटात २ लाख ७८ हजार १०० मृत्यू नोंदवले गेले आहेत. याशिवाय ७० ते ७४ वर्षे वयोगटात २ लाख ७० हजार ४०० आणि ९० ते ९४ वर्षे वयोगटात १ लाख ८४ हजार १०० मृत्यू झाल्याचे चित्र आहे. या आकडेवारीवरून वाढत्या वयाबरोबर प्रदूषणाचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट होते.

पीएम २.५ ठरतोय शत्रू

या मृत्यूंमध्ये पीएम २.५ या सूक्ष्म धूलिकणांचा वाटा सर्वाधिक आहे. वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे तयार होणारे हे सूक्ष्म कण थेट फुफ्फुसांमध्ये आणि रक्तप्रवाहात प्रवेश करतात. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक, फुफ्फुसांचे आजार, दमा आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

नवजात बालकांवरही परिणाम

आकडेवारीतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकांवरील परिणाम. ० ते २७ दिवसांच्या बालकांमध्ये सुमारे १ लाख १६ हजार ७०० मृत्यू प्रदूषणाशी संबंधित असल्याचे दिसते. या वयोगटात घरगुती वायुप्रदूषणाचा वाटा सर्वाधिक आहे. पारंपरिक चुली, लाकूड, कोळसा किंवा इतर घन इंधनांच्या वापरामुळे निर्माण होणारा धूर गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी विशेषतः घातक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एक ते अकरा महिन्यांच्या बालकांमध्ये २० हजार ४४०, तर एक ते चार वर्षे वयोगटात ६ हजार ३० मृत्यू नोंदवले गेले आहेत. बालपणानंतर किशोरवय आणि तरुणांमध्ये मृत्यूंची संख्या तुलनेने कमी असली, तरी वयाच्या ४० वर्षांनंतर ती पुन्हा वाढू लागते. ४५ ते ४९ वर्षे वयोगटात २९ हजार ९८०, ५० ते ५४ वर्षे वयोगटात ४७ हजार २५०, ५५ ते ५९ वर्षे वयोगटात ८४ हजार १८०, तर ६० ते ६४ वर्षे वयोगटात १ लाख ४३ हजार मृत्यू नोंदवले गेले आहेत. यानंतर प्रत्येक वयोगटात मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढताना दिसते.

घरगुती वायुप्रदूषण आणि ओझोन प्रदूषणाचाही मोठा वाटा

ओझोन प्रदूषणाचाही मृत्यूंमध्ये काही प्रमाणात वाटा असला तरी पीएम २.५ आणि घरगुती प्रदूषण हे प्रमुख कारण असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. विशेषतः शहरी भागातील वाढते वाहनप्रदूषण, औद्योगिकीकरण आणि ग्रामीण भागात अजूनही सुरू असलेला पारंपरिक इंधनांचा वापर ही चिंतेची बाब आहे.

उपाय काय?

तज्ज्ञांच्या मते, स्वच्छ इंधनाचा वापर, प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, हरित क्षेत्रांची वाढ आणि हवेच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची ही संख्या आगामी काळात आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच आरोग्य रक्षणासाठीही वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज बनली आहे.
Salkhan Fossil : पृथ्वीच्या जन्माची गोष्ट सांगणारे ‘सोनभद्र’! 40 देशांतील शास्त्रज्ञांनाही समजली ताकद; बनणार जागतिक पर्यटन स्थळ

Web Title: Air pollution deaths polluted air health enemy elderly children most affected report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Air Pollution
  • air pollution news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा
1

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
2

Shiv Sena Split : पक्षांतर्गत लोकशाही संपुष्टात आल्यामुळेच फूट पडली ; शिवसेनेच्या वतीने नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
3

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन
4

AI Safety : “AI ची भीती रास्त आहे!” सॅम ऑल्टमन यांचा मोठा इशारा; सुरक्षित विकासासाठी उद्योगावर विश्वास ठेवण्याचं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.