Navratri 2026 : नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेला अर्पिण करा मखाना-नारळाची चवदार बर्फी, रेसिपी नोट करा
Makhana Coconut Barfi Recipe : नवरात्रीच्या उत्सवात देवीला गोड पदार्थ नैवेद्यात दाखवा. आज आपण मखाने आणि नारळापासून गोड, चविष्ट अशी बर्फी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.
नवरात्रीच्या उत्सवात देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. लोक देवीला हार, फुले आणि गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात. आज नवरात्रीचा पाचवा दिवस, या दिवशी देवी स्कंदमातेला पूजले जाते. तुम्हीही जर नवरात्रीनिमित्त घरी गोड पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. आज आम्ही तुम्हाला मखाना आणि नारळापासून टेस्टी बर्फी कशी तयार करायची याची एक सोपी, सहज आणि झटपट रेसिपी सांगणार आहोत. रेसिपीची खासियत म्हणजे फक्त ५ साहित्यापासून आपण ही बर्फी तयार करणार आहोत. शिवाय मखाना आणि नारळाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे मानले जाते. यामुळेच ही डिश चविष्ट तसेच पाैष्टीक गटात मोडली जाते. ही बर्फी लगेच खराबही होणार नाही ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवून आठवडाभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. चला जाणून घेऊया रेसिपीसाठीलागणारे साहित्य आणि कृती.