Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात काही चटकदार खाण्याची इच्छा होतेय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाची चाट’
Farali Chaat Recipe : नवरात्रीच्या उपवासात जर तुम्हाला काही टेस्टी आणि चटपटीत खायची इच्छा होत असेल तर उपवासाची चाट तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. याची रेसिपी नोट करा.
Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात काही चटकदार खाण्याची इच्छा होतेय? मग अशाप्रकारे बनवा 'उपवासाची चाट'
Follow Us
Follow Us:
नवरात्रीत काही टेस्टी खायचंय का?
मग उपवासाची टेस्टी चाट बनवून खा.
ही चाट संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल.
नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा शेवटचा दिवस साजरा केला जाणार आहे. तसेच २० ऑक्टोबर हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जाणार आहे. नवरात्रीत अनेक लोक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. पण नऊ दिवस फक्त उपवासाचे काही निवडक पदार्थ खाल्ल्याने जेवणाचा कंटाळा येऊ लागते, तसेच मन तृप्त होत नाही. तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन जर तुम्हालाही कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आज आपण या लेखात उपवासाची टेस्टी आणि चटपटीत चाट कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपीजाणून घेणार आहोत. चाट हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा. अशात पदार्थाला थोडा ट्विस्ट देऊन आपण एक अशी चाट तयार करणार आहोत जी उपवासाच्या दिवशीही खाल्ली जाऊ शकते. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.