Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज, मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले साऱ्यांचे लक्ष

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर कान्समधील प्राजक्ता माळीच्या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘निरुपा सारीज’ने तयार केलेली साडी नेसून मराठमोळ्या साड्यांची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या निमित्ताने केले.

  • By सुरुची कदम
Updated On: May 27, 2026 | 03:30 PM
कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज, मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले साऱ्यांचे लक्ष

कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपा सारीज’चा साज, मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले साऱ्यांचे लक्ष

Follow Us
Follow Us:

यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठी कलाकारांनी खास मराठमोळा ठसा उमटवला. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटवर पारंपरिक नऊवारी साडीत केलेल्या आकर्षक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, तिच्या या चर्चित लूकला ठाण्यातील निरुपाज येवला पैठणी अँड सिल्क सारीजच्या खास साडीचा साज लाभला होता.

Amruta Fadnavis New Look : जरीची साडी, सोनेरी काठ असा मराठमोळा साज; अमृता फडणवीस यांचा पैठणी साडीतला मोहक लुक

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात प्राजक्ताच्या या लूकची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. मोरपिशी छटेतील नऊवारी, त्यावर भरजरी शेला, पारंपरिक नथ, ठुशी, कमरपट्टा आणि मराठमोळा दागिन्यांचा साज अशा संपूर्ण लूकमधून तिने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जागतिक मंचावर अभिमानाने सादर केली.

कान्सच्या रेड कार्पेटवर सहसा वेस्टर्न गाऊन्स आणि ग्लॅमरस फॅशन पाहायला मिळते. मात्र, प्राजक्ताने भारतीय परंपरा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला प्राधान्य देत नऊवारीची निवड केल्याने तिचा लूक सर्वांपेक्षा वेगळा आणि उठून दिसणारा ठरला. फॅशनप्रेमींसह मराठी प्रेक्षकांनीही तिच्या या निर्णयाचे भरभरून कौतुक केले आहे.

‘निरुपा सारीज’ने तयार केलेल्या या साडीमध्ये पारंपरिक विणकाम, आकर्षक रंगसंगती आणि आधुनिक एलिगन्स यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. मराठमोळ्या साड्यांची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम या निमित्ताने झाले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर कान्समधील अनुभव शेअर करत ‘मराठी ठसका’ जागतिक रेड कार्पेटवर घेऊन जाण्याचा आनंद व्यक्त केला होता. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. निरुपाज सारीज हा खात्रीशीर येवला पैठणी आणि सिल्क साड्या देणारा ब्रँड आहे. प्राजक्तासह चित्रपट सृष्टीतील सुबोध भावे, अभिजित खांडकेकर, अपूर्वा नेमळेकर, पूजा सावंत’ सिद्धार्थ चांदेकर, केतकी माटेगावकर, हेमल इंगळे, पल्लवी पाटील आदी कलाकारांनी निरुपाज भेट देत येथील साड्यांचे कौतुक केले आहे.

Cannes 2026: कान्सच्या रेड कार्पेटवर चमकली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन! निळा मरमेड गाऊन, हिऱ्यांच्या दागिन्यांनी वेधले साऱ्यांचे

‘निरुपा सारीज’च्या संस्थापिका निरुपा तायडे म्हणाल्या, “भारतीय साडी ही केवळ फॅशन नसून संस्कृती आणि परंपरेची ओळख आहे. प्राजक्ता माळीसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीने जागतिक मंचावर आमच्या साडीची निवड करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. कान्ससारख्या प्रतिष्ठित मंचावर ठाण्यातील ब्रँडची झळाळी पाहायला मिळाल्याने स्थानिक फॅशन उद्योगातही उत्साहाचे वातावरण असून, भारतीय पारंपरिक साड्यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा अधोरेखित झाली आहे.”सोशल मीडियावरही ‘निरुपाज सारीज’ला मोठा प्रतिसाद मिळत असून, ब्रँडच्या पारंपरिक आणि आकर्षक कलेक्शनची झलक nirupas.sarees_official/ वर पाहायला मिळते.

Web Title: Nirupa sarees adorning prajaktas beauty on the red carpet of cannes marathmola nouvari grabbed the attention of everyone on the global stage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Cannes 2026
  • fashion tips
  • prajakta mali

संबंधित बातम्या

काठपदरच्या साडीला द्या मॉडर्न टच! ‘या’ ब्लाऊज डिझाईन्सने खुलून दिसेल आकर्षक लुक
1

काठपदरच्या साडीला द्या मॉडर्न टच! ‘या’ ब्लाऊज डिझाईन्सने खुलून दिसेल आकर्षक लुक

गौरी गणपतीच्या सणांसाठी खरेदी करा मोत्याचे सुंदर इअरकफ! भरगच्च दागिन्यांनी लुक दिसेल उठावदार
2

गौरी गणपतीच्या सणांसाठी खरेदी करा मोत्याचे सुंदर इअरकफ! भरगच्च दागिन्यांनी लुक दिसेल उठावदार

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक
3

Sakshee Gandhi: ‘लज्जा से मरे रे…’, कलमकारी साडीत ‘इंदुराणी’ साक्षी गांधीचा कातिल लुक

गौरी-गणपतीच्या सणासाठी स्पेशल दागिना! ‘या’ Invisible Necklace डिझाईन्स वरून हटणार नाही नजर
4

गौरी-गणपतीच्या सणासाठी स्पेशल दागिना! ‘या’ Invisible Necklace डिझाईन्स वरून हटणार नाही नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.