पिझ्झा न खाल्ल्यास काय होते?
पिझ्झा हे मूळचे इटालियन खाद्य आहे, पण गेल्या काही दशकांत त्याची लोकप्रियता भारतात लक्षणीयरीत्या वाढली आहे. लहान मुले, प्रौढ आणि तरुण या सर्वांनाच त्याची ओढ असते, पोट कितीही भरले तरी बरेच लोक पिज्झा खाण्याचा मोह सोडू शकत नाहीत.
तुम्हाला पिझ्झा कितीही आवडत असला तरी ते आरोग्यदायी अन्न नाही हे सर्वांनाच माहीत आहे. मैद्याने बनलेला हा पदार्थ अनेक आजार घेऊन येतो. न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तुम्ही महिनाभर पिझ्झा खात नसाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर काय सकारात्मक परिणाम होईल याबाबत त्यांनी ही माहिती दिलीये. (फोटो सौजन्य – iStock)
अनहेल्दी पदार्थांपासून सुटका
पिझ्झा हे एक अत्यंत अनहेल्दी अन्न आहे जे आपल्या आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते, जर तुम्ही ते एका महिन्यासाठी सोडले तर तुम्ही या काळात निरोगी पदार्थांवर अधिक अवलंबून राहता आणि त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मुळात अनहेल्दी खाण्यापासून तुम्ही दूर राहता हे अधिक महत्त्वाचे आहे.
हेदेखील वाचा – अनहेल्दी सोडा, सकाळच्या नाश्त्यात एनर्जीने भरलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश करा
लठ्ठपणा

पिझ्झामुळे येतो लठ्ठपणा
पिझ्झामध्ये सामान्यतः अधिक प्रमाणात तेल आणि कॅलरी असतात. कारण यामध्ये मैदा, चीज अशा चरबीयुक्त पदार्थांचा अधिक वापर केला जातो, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. महिनाभर पिझ्झा न खाल्ल्याने तुमचे वजन बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. तसंच वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
कोलेस्टेरॉलपासून संरक्षण
जेव्हा तुम्ही बराच काळ पिझ्झा खात नाही, तेव्हा तुमच्या नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होऊ लागते, जे तुम्हाला चांगल्या आरोग्याची जाण करून देते. पिझ्झा सतत खाल्ल्याने नसांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जमा होऊन हृदयाच्या समस्याही वाढू लागतात.
BP नियंत्रित राहील

पिझ्झा खाणे बंद केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील
पिझ्झामध्ये असलेल्या फॅटमुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जर तुम्ही ते टाळले तर तुमचे बीपी नक्कीच नियंत्रित राहील. तसंच ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी नक्की एक महिना पिझ्झा न खाता रहा. तुम्हाला स्वतःला याचा फरक जाणवेल आणि त्रास होणार नाही
हृदयाचे आजार होणार नाहीत
पिझ्झामध्ये असलेले मोझेरेला चीज खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, तर तुम्ही ते न खाल्ल्यास हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. पिझ्झा जास्त प्रमाणात खाल्ल्यास हृदयाच्या आजाराचा धोका वाढू लागतो. अनेकदा मैद्यामुळे हा त्रास होताना दिसून येतो.
मधुमेहाचा धोका कमी होईल

मधुमेहाचा त्रास कमी होण्यास मदत
पिझ्झामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो, तुम्हाला डायबिटीस असेल तर सहसा पिझ्झा खाणे टाळा. जर तुम्ही महिन्यातून जास्त पिझ्झा खात असाल तर नक्कीच तुमचा डायबिटीस जास्त वाढेल. त्यामुळे एक महिना पिझ्झा न खाता आपल्या डायिबिटीसच्या पातळीकडे लक्ष द्या कमालीचा फरक दिसून येईल.
पचन सुधारते
जर तुम्ही 30 दिवस पिझ्झा खाणे टाळले तर तुम्हाला दिसेल की तुमची पचनशक्ती हळूहळू सुधारत आहे आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होत आहेत. पिझ्झा सतत खाल्ल्याने पोटात दबकन अन्न बसते आणि भूक लागत नाही आणि पचनाच्या समस्या अधिक वाढतात. मात्र पिझ्झा न खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते
त्वचा चांगली राहते

त्वचाही चांगली राहण्यास मदत मिळेल
जास्त पिझ्झा खाल्ल्याने त्वचेची चमक कमी होऊन ती निस्तेज आणि निर्जीव दिसू शकते. महिनाभर पिझ्झा न खाल्ल्याने तुमची त्वचा सुधारू शकते. त्वचेवर मुरूमं येणं वा पुळ्या येण्यासारखे त्रास यामुळे होत नाहीत आणि त्वचा अधिक चमकदार आणि तेजस्वी दिसून येते.
आत्मनियंत्रण वाढेल
महिनाभर पिझ्झा सोडून देण्यासाठी तुम्हाला प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे, त्यामुळे तुमचा आत्म-नियंत्रण वाढेल आणि भविष्यात तुम्ही तुमच्या आहारातून अहितकारक गोष्टी काढून टाकू शकाल, ज्यामुळे तुमचे आरोग्य अधिक चांगले आणि मजबूत राहण्यास मदत मिळेल.
जागरूकता वाढेल
जेव्हा तुम्ही इतके दिवस पिझ्झा खात नाही आणि तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल, तेव्हा आरोग्यदायी आहाराच्या सवयींबद्दल तुमची जागरूकता वाढेल जी भविष्यात खूप उपयुक्त ठरेल. तसंच तुमच्या आहारात यामुळे अधिक पौष्टिक आणि चांगल्या आहाराचा तुम्ही समावेश करून घ्याल हे नक्की!






