आजकालच्या धावपळीच्या दुनियेत सर्वचजण फार व्यस्त असतात. अनेकदा यामुळेच लोकांचे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होते. अनेकदा तज्ज्ञांद्वारे संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या आहारात प्रोटिन्स, कर्बोदके आणि पोषकतत्वांचे मुलबक प्रमाण असणे गरजचे असते, ही पोषकतत्वे आपल्याला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करतात.
सकाळचा नाश्ता तर नेहमीच हेल्दी असायला हवा कारण यानंतर आपला संपूर्ण दिवस कामात जात असतो. सकाळच्या नाश्त्याला सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. सकाळचा नाश्ता करणे कधीही टाळू नये, कारण यामुळे आपल्या शरीरात दिवसभर ‘एनर्जी’ राहते आणि आपल्याला थकवाही जाणवत नाही. सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक खावे म्हणजे नक्की काय खावे, असा प्रश्न अनेकांना पडत असतो म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी नाश्त्याच्या पदार्थांची लिस्ट घेऊन आलो आहोत. हे एनर्जीने भरलेले पदार्थ तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करतील.
[read_also content=”जेवणाची चव वाढवतील मशरूमचे हे 5 पदार्थ, वाचा रेसिपीज https://www.navarashtra.com/lifestyle/these-5-mushroom-dishes-will-enhance-the-taste-of-food-read-the-recipes-537724.html”]
ओट्स
नाश्त्याच्या पदार्थांमध्ये तुम्ही ओट्सचे नाव नक्कीच ऐकले असावे. ओट्समध्ये अनेक पोषकतत्वे आढळली जातात. हा एक पौष्टिक नाश्ता मानला जातो, यात व्हिटॅमिन बी, लोह, जस्त, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर हे घटक सामावलेले असतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेकारक ठरतात. बऱ्याचदा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचे सेवन केले जाते. ओट्स तुम्ही दुधात मध घालून त्यात मिक्स करून खाऊ शकता. अथवा यापासून इतरही प्रकार बनवले जाऊ शकतात जसे की इडली, उपमा.
उकडलेली अंडी
अंडी ही प्रोटीन्सचा एक चांगला स्रोत आहेत. यात भरपूर प्रथिने असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. बरेचजण डाएटमध्ये उकडलेल्या अंड्यांचा समावेश करतात. याला बनवायला जास्त वेळही लागत नाही. सकाळच्या नाश्त्यात याचा समावेश जरूर करा.
दूध आणि ब्राउन ब्रेड
मोठयांद्वारे अनेकदा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात अनेक पोषक घटक असतात, जी हाडे मजबूत करण्यास मदत करतात. जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, झिंक, फायबर यांसारखी अनेक खनिजे असतात. या दोघांचे कॉम्बिनेशन सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे.
उपमा / पोहे / इडली
आपल्या भारतीयांच्या नाश्त्यात उपमा, इडली, पोहे या पदार्थांचा समावेश पाहायला मिळतो. अनेकांच्या घरात हे पदार्थ सकाळच्या नाश्त्यात बनवले जातात. हे पदार्थही आपल्या आरोग्यसाठी फायद्याचे आहेत. याच्या सेवनाने शरीराला पोषक घटकही मिळतात आणि एनर्जीदेखील मिळते.
उकडलेली कडधान्ये
अनेकदा बऱ्याच जणांना उकडलेली कडधान्ये खायला आवडत नाहीत. मात्र यात असलेले फायबरचे प्रमाण तुम्हाला दिवसभर एनर्जी देण्यास मदत करते. यात प्रथिने आणि जीवनसत्त्वांसारखे पोषक घटकही आढळतात.