गरमागरम भाकरीसोबत करा चमचमीत बेत! गावरान पद्धतीमध्ये झटपट बनवा शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी
जेवण बनवताना सर्वच महिलांना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे जेवणात काय भाजी बनवावी. नेहमीच तीच ठराविक भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. सतत कडधान्य खाल्ल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि पौष्टिक भाज्या बनवून खाव्यात. आज आम्ही तुम्हाला गावरान पद्धतीमध्ये शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा न चुकता शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. कारण यामध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. हाडांची ताकद वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाव्यात. या शेंगांपासून सूप, भाजी आणि आमटी बनवून खाल्ली जाते. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत शेवग्याच्या शेंगांची भाजी अप्रतिम लागेल. कमीत कमी मसाले आणि कमी वेळात झटपट तयार होणारी भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : गट हेल्थसाठी अमृतसमान आहे हे ड्रिंक, महागडे प्रोबायोटिक्स खरेदी न करता घरीच तयार करा






