Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता फक्त ७१५ रुपयांत काश्मीरला पोहचा… कटरा ते श्रीनगर पहिली ट्रेन झाली सुरू, चिनाब पुलाचा पूर्ण आनंद लुटता येईल

अनेक वर्षांपासूनचे जम्मू-काश्मीरचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. चिनाब पूलच्या मदतीने आता जम्मू-काश्मीर आता भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. वंदे भारत ट्रेन सुरु झाली असून ट्रेनचं भाड, वेळ याविषयी सर्व माहिती जाणून

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2025 | 08:54 AM
आता फक्त ७१५ रुपयांत काश्मीरला पोहचा... कटरा ते श्रीनगर पहिली ट्रेन झाली सुरू, चिनाब पुलाचा पूर्ण आनंद लुटता येईल

आता फक्त ७१५ रुपयांत काश्मीरला पोहचा... कटरा ते श्रीनगर पहिली ट्रेन झाली सुरू, चिनाब पुलाचा पूर्ण आनंद लुटता येईल

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीर हे ठिकाण भारतातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. याचे सौंदर्य इतके सुंदर आणि अलौकिक आहे की याला स्वर्गाची उपमा दिली जाते. पर्यटनासाठी हे ठिकाण म्हणजे पर्यटकांची पहिली पसंती! त्यातच आता काश्मीरला जाण्याचा मार्ग आता आणखीन सोईस्कर झाला आहे. अनेक वर्षांपासूनचे जम्मू-काश्मीरचे स्वप्न आता अखेर पूर्ण झाले आहे. मागेच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. या पुलामुळेच आता काश्मीरला भारताच्या नेटवर्कशी जोडले जाणार आहे, म्हणजेच आता जगातील सर्वात उंच पुलावरून आता हाय स्पीड ट्रेन धावणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, वंदे भारत ट्रेन सामान्य लोकांसाठी शनिवारी ७ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. शनिवारी पहिली भारत ट्रेन चालवण्यात आली होती. या दोन्हींमध्ये १०० % बुकिंग आधीच झाले आहे, म्हणजेच आता वंदे भारत ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी नाही. तुम्ही ट्रेन बुक करता तेव्हा याचे भाडे किती आहे आणि वंदे भारत किती वाजता धावते, कोणत्या मार्गावरून धावते ही पूर्व माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

भारतातील हास्यास्पद गाव ज्याचं नाव ऐकताच शरमेने लाल होतात महिला; रंजक इतिहास जाणून घेऊया

किती ठिकाणी ट्रेनचा थांबा असेल

काश्मीरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अनेक ठिकाणी थांबा असणार आहे. यामध्ये दिल्ली, अंबाला कॅन्टोन्मेंट, लुधियाना जंक्शन, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी (कटरा) या स्थानकांचा समवेश आहे. यानंतर रियासी बनिहाल कांजीगुंड, अनंतनाग आणि श्रीनगर अशा रेल्वे स्थानकांवर ट्रेनचा थांबा असणार आहे.

  • पहिली ट्रेन (२६०४१) श्री माता वैष्णोदेवी कटरा स्टेशनवरून सकाळी ८:१० वाजता निघेल आणि बनिहालला सकाळी १० वाजता पोहोचेल.
  • त्यानंतर ही ट्रेन सकाळी ११:१० वाजता श्रीनगरला जाईल. त्याचप्रमाणे दुसरी ट्रेन (२६४०३) श्री माता वैष्णोदेवी
  • कटरा येथून दुपारी २:५५ वाजता सुटेल. ती शनिवारी संध्याकाळी ६ वाजता बनिहालमार्गे पोहोचेल.
  • परतीच्या प्रवासात, ही ट्रेन क्रमांक २६४०२ होईल, जी वंदे भारत जम्मू तवी एक्सप्रेस आहे. ती श्रीनगर स्टेशनवरून दुपारी २:०० वाजता सुटेल, ती बनिहाल स्टेशनवर दुपारी ३:१० वाजता आणि श्री माता वैष्णो देवी कटरा स्टेशनवर संध्याकाळी ५:०५ वाजता पोहोचेल.
  • त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक २६४०४, श्रीनगर जम्मू तवी वंदे भारत एक्सप्रेस, सकाळी ८ वाजता श्रीनगर स्टेशनवरून निघेल.
  • ही ट्रेन सकाळी ९.०२ वाजता बनिहाल स्टेशनला आणि सकाळी ११.०५ वाजता श्री माता वैष्णोदेवीला पोहोचेल.

भाडे किती असेल?

आम्ही तुम्हाला सांगतो की, श्रीनगर ते कटरा दरम्यान चेअर कारचे भाडे सर्व भाड्यांसह ७१५ रुपये इतके असणार आहे, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १३२० रुपये आकारले जाईल. दोन्ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण ४ वंदे भारत गाड्या धावणार आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील नवी दिल्ली आणि कटरा दरम्यान दोन वंदे भारत गाड्या धावत होत्या.

पहिल्या ट्रेनच्या परतीचं भाड

परतीच्या प्रवासात या ट्रेनचा क्रमांक २६४०२ असा बदलण्यात आला आहे. या परतीच्या प्रवासात ट्रेनमधील चेअर कारचे भाडे ८८० रुपये इतके असणार आहे तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १,५१५ आकारले जाणार आहे. दुपारी २ वाजता श्रीनगरवरून ही ट्रेन सुटणार आहे आणि कटरा येथे ही ट्रेन ४:५८ पोहचेल असे अशी माहिती आहे. दुपारी ३.०८ वाजता बनिहाल येथे दोन मिनिटे थांबेल. २६४०१/२६४०२ मंगळवार सोडला तर या ट्रेन आठवड्यातील इतर सहा दिवस धावतील.

इतर ट्रेनचे भाडे

दुसरी ट्रेन २६४०३ ही कटरा येथून दुपारी २.५५ वाजता निघते आणि श्रीनगरला सायंकाळी ५.५३ वाजता पोहोचते. ती २ तास ५८ मिनिटांत प्रवास पूर्ण करते. या ट्रेनमध्ये चेअर कार सीटचे भाडे ६६० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १,२७० रुपये असेल. श्रीनगरहून परतीच्या प्रवासात ही ट्रेन २६४०४ होते. ती श्रीनगरहून सकाळी ८ वाजता निघते आणि कटरा येथे १०.५८ वाजता पोहोचते. ती सकाळी ९ वाजता बनिहाल येथे दोन मिनिटे थांबते. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये आहे आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १,३२० रुपये आहे. ट्रेन २६४०३/०४ बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावते.

Web Title: Now reach kashmir for just rs 715 the first train from katra to srinagar has started you can fully enjoy the chenab bridge travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • jammu kashmir
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
3

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
4

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.